Home
Home चंद्रपूर भाजप नेत्यांच्या  प्रमुख उपस्थिती अरुण लखाणी यांनी दाखल केला नामांकन अर्ज.

भाजप नेत्यांच्या  प्रमुख उपस्थिती अरुण लखाणी यांनी दाखल केला नामांकन अर्ज.

0
12

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(का. प्र.): महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला.

                निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज सादर केला.

 नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी पक्ष पदाधिकारीलोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

                    भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अरुण लखाणी यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा दर्शविला.

   यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख ना. पंकज भोयरपालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईकेभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोटेकरपदवीधर निवडणूक नोंदणीचे सहप्रमुख सुधीर दिघेमाजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिरआ किर्तिकुमार भांगडियाआ. किशोर जोरगेवारआ. समीर कुणावारआ देवराव भोंगळेआ. करण देवतळेआ,मिलिंदनरोटे, आ श्रीकांत भारतीमाजी खा. अशोक नेतेमाजी खा.रामदास तडसमाजी आमदार सुदर्शन निमकरदेवराव होळीमाजी आ अविनाश वारजूरकरमहापौर संगीता खांडेकर आदी उपस्थित होते.

  यावेळी उपस्थित नेत्यांनी अरुण लखाणी यांच्या उमेदवारीबाबत विश्वास व्यक्त करत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळेलअसा विश्वास व्यक्त केला.

              स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी आणि मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी अरुण लखाणी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेलअसे मतही अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

  नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर अरुण लखाणी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. वर्धाचंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी काम करणार आहे,” असे सांगितले.

यावेळी भाजप पदाधिकारीकार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here