===============================
*चंद्रपूर*
=============================
चंद्रपुरातील रहमत नगर बिनबागेट येथील शाही दरबार हॉटेलमध्ये आज दुपारी भरदिवसा हाजी अली यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सरवर जेवण करत असताना पाच ते सहा सशस्त्र व्यक्तींनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला.
हाजी सरवर हा हत्या, खंडणी आणि कोळसा चोरीसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. त्याच्यावर चंद्रपूरसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल होते. आज दुपारच्यावेळी हॉटेलमध्ये जेवण करत असताना त्याच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.हाजी सरवरच्या अवस्थेबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
===============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===============================
कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,