Home
Home चंद्रपूर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरमधील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार.

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरमधील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार.

0
96

===========================

आ. मुनगंटीवार यांनी उचलले सकारात्मक पाऊल
रेल्वे मुख्य महाप्रबंधकांची आ. मुनगंटीवार यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

                            चंद्रपूर

            हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र) :- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनुसार, चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक यांना पत्र पाठवून मुंबई येथे बैठक घेण्याची विनंती केली होती. चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक.धर्म वीर मीना यांच्यासोबत बैठक पार पडली.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्देशांनुसार ही बैठक घेण्यात आली. यामध्ये ९०० घरे हटविण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच बैठक घेण्यात आली.
चंद्रपूर शहरातील व आजूबाजूच्या भागातील २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा निवारा हिरावला जाऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक.धर्म वीर मीना यांच्याकडे केली. या चर्चेवर सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे विभाग नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत संवेदनशील असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक.धर्म वीर मीना यांनी आश्वासित केले.
मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक श्री धर्म वीर मीना, डॉ. मंगेश गुलवाडे, अजय दुबे, अनिल डोंगरे,अमित निरंजने, राकेश बोमनवार, होमेश्वर नंदनवार, महेश झिटे सुभान पठाण आणि सुरेंद्र मंचलवार तसेच या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हाधिकारी, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी झूमद्वारे उपस्थित होते.
चंद्रपूर शहरात नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नवीन रेल्वे लाईन जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील सावरकर नगर, रेल्वे स्टेशन यार्ड, रयतवारी, लखमापूर या भागांतील रेल्वे विभागाच्या जमिनीवर गेल्या २५ वर्षांपासून काही मजूरांनी पक्की घरे बांधलेली आहेत. रेल्वे विभागाकडून या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी विविध उद्योग सुरू असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर मजूर वास्तव्य करत आहेत. त्यांनी रेल्वे विभागाच्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करून त्यांच्या राहण्यासाठी नवीन घरे उभारणे अत्यंत आवश्यक आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मुंबई येथे रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक.धर्म वीर मीना यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये. या बैठकीत चंद्रपूर रेल्वे स्टेशन वार्ड, सावरकर नगर, रय्यतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.       ===================      *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ====================      *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here