Home
Home चंद्रपूर आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचा झाला सन्मान

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कंत्राटी कामगारांचा झाला सन्मान

0
70

==============================

                            चंद्रपूर

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर. (का प्र ) :-६५ व्या महाराष्ट्र  दिनानिमित्त तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडून कंत्राटी कामगारांचा सत्कार सोहळा संपन्न
आमदार सुधीर मुनगंटीवार मित्र परिवार आणि भारतीय जनता पार्टी मूल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मूल येथील निर्मानाधीन उपजिल्हा रुग्णालयात मूल येथील कामगारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवात कामगारांच्या हातून  दीपप्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण मोहूर्ले यांनी केले. या कार्यक्रमात माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, शहर महामंत्री किरण बुटले, मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे बांधकाम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, वंदना वाकडे, मोती टेहलानी, अलका चौधरी, सुधाकर मोहूर्ले, हर्षल गांडलेवार, आयशा शेख, युवराज चावरे, किरण कापगते, अनिता दूमेंवार, सुनील तरोने, युवराज चवरे, संतोष कापुलवार, पंकज लांडवे, माला माणिकपुरी, सीमा धुर्वे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कातकर यांनी केले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कंत्राटी कामगारांचा सत्कार झाल्याबद्दल उपस्थित कामगारांनी आनंद व्यक्त केला.   ====================    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===================       *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                      *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here