पैनगंगा नदी पात्रातुन दालमीया सिमेंट कंपनीला पाणी देऊ नये अन्यथा आंदोलन: सरपंच पूनम जरीले.

0
17

==================================

दालमीया सिमेंट कंपनीस कोडशी खुर्द गावाजवळील पैनगंगा नदी पात्रातुन पाणी उचल करण्यास कोडशी खुर्द येथील ग्रामस्थांचा आक्षेप तहसिलदार कोरपना यांना दिला आक्षेप अर्ज .

                    हॅलो चांदा न्युज

कोरपना(ता.प्र.): कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातुन दालमीया सिमेंट कंपनीला पाणी देऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोडशी खुर्द येथील सरपंच पूनम जरीले व गावकऱ्यांनी दिला आहे. कोरपना तालुक्यातील दालमीया सिमेंट कंपनीस कोडशी खुर्द गावाजवळील पैनगंगा नदी पात्रातुन पाणी उचल करण्यास कोडशी खुर्द येथील ग्रामस्थांचा आक्षेप असून कोडशी खुर्द ग्राम पंचायत सरपंच पूनम नरेंद्र जरीले, ग्राम पंचायत सदस्यांसह गावातील नागरिकांनी कोरपना तहसिलदार पल्लवी आखरे यांना दिनांक 02/05/ 2025 रोजी आक्षेप अर्ज सादर केला असून या आक्षेपाची दखल घ्यावी अशी विनंती देखील केली आहे. परंतु अजूनपर्यंत ही सादर केलेल्या आक्षेप अर्जाची दखल घेण्यात आली नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कार्यालयीन जाहिरनामा क्र. कावि/मह.सह/तह/प्र-१/२०२५, दिनांक ३०/०४/२०२५ चे अनुषंगाने हा आक्षेप अर्ज सादर करण्यात आला आहे, हे मात्र विशेष!                      संदर्भिय जाहीरनाम्याचे अनुषंगाने कोडशी खुर्द येथील गावकऱ्यांचा आक्षेप या प्रमाणे आहे की, दालमिया सिमेंट कंपनी नारंडा येथे स्थित असुन, सदर कंपनीला पाण्याची टंचाई जात असल्याने पैनगंगा नदीपात्रातुन पाणी उचल करण्याकरीता तात्पुरते पाईप लाईन टाकुण पाणी उचल करण्याची परवानगी मागितली असावी.आपल्या कार्यालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती मिळाली आहे, परंतु सदर कंपनीला पैनगंगा नदी पात्रातुन पाणी उचल करण्याची परवानगी दिल्यास गावातील नळ योजना बंद होईल तसेच गुरे ढोरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवुन भिषण दुष्काळ पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दालमिया सिमेंट कंपनीला संदर्भांकित जाहिरनाम्यानुसार पैनगंगा नदीपात्रातुन तात्पुरते स्वरूपाची पाईन लाईन टाकुण पाणी उचल करण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आलीआहे, हे मात्र विशेष!                                 मौजा कोडशी खुर्द, तह. कोरपना, जि. चंद्रपुर येथील नागरिकांच्या सादर केलेल्या आक्षेप अर्जावर वृत्त लिहेपर्यंत कोणताही विचार करण्यात आला नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे, हे ही मात्र तेवढेच.खरे!      जाहिरनाम्यावर आक्षेप असल्याने मौजा कोडशी खुर्द येथील स्थानिक वास्त्तव्य करण-या नागरिकांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे असे बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे.               आक्षेप असतांना सदर कंपनीला पाणी उचल करण्याची परवानगी दिल्यास गावक-यांकडुन तिव्र आंदोलन करण्यात येईल व त्यापासुन होणा-या परिणामास प्रशासन स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार कोरपना यांना सादर केलेल्या आक्षेप अर्जात कोड़शी खुर्द येथिल ग्रामपंचायतचे सरपंच पूनम नरेंद्र जरीले, अनेक ग्राम पंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनीही हस्ताक्षर केले आहे.

विश्वासनीय सूत्रांनुसार अशी माहिती मिळाली आहे की दालमिया कंपनीला पाणी चा पुरवठा केला जात आहे हे कितपत सत्य आहे? असे असल्यास गावकऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या आक्षेप अर्जाचा विचार केला नाही का? हा प्रश्न अजूनही अनूत्तरीत आहे? दालमिया कंपनीला आशीर्वाद कोणाचा? कोणाशी झाली हातमिळवणी ? असे अनेक प्रश्न आता चर्चेत येऊ लागले आहे, हे मात्र विशेष!

30/04/2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यातील मुख्य मजकूर याप्रमाणे होते की
या व्दारे सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, दालमिया सिमेंट कंपनी, नारंडा तह. कोरपना यांनी दालमियाँ सिमेंट कंपनी पाण्याअभावी बंद झाले असल्याने 5000 लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मौजा पिपरी तह. कोरपना गावाला लागुन असलेल्या पैनगंगा नदी पात्रातुन पाणी उचल करण्याकरीता दालमिया सिमेंट कंपनीला अस्थाया स्वरुपाची पाईपलाईन टाकुन कंपनीच्या कामाकरीता पाणी उचल करण्याकरीता परवानगी मागीतलेली आहे.

ज्या कोणास दालमियाँ कंपनीस पिपरी गावाजवळील वैनगंगा नदी पात्रातुन पाणी उचण्याबाबत पाईपलाईन टाकण्यास आक्षेप घ्यावयाचा असल्यास दिनांक 2/05/2025 रोजी पर्यंत तहसिल कार्यालय कोरपना येथे लेखी स्वरुपात आक्षेप सादर करावा मुदतीनंतर येणा-या आक्षेपाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
असा दिनांक 30/04/2025
स्थळ :- कोरपना पल्लवी आखरे तहसीलदार कोरपना यांच्या सहीनिशी जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता.

या प्रकाशित जाहीरनामावर कोडशी खुर्द येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी आक्षेप नोंदविले आहे, एवढेच नव्हे तर पैनगंगा नदी पात्रालगत असलेल्या अनेक गावातील नागरिकांनी सुद्धा या प्रकाशित झालेल्या जाहीरनाम्याबाबत आक्षेप अर्ज सादर केले असल्याची माहिती मिळाली आहे वरिष्ठ संबंधित अधिकारी याकडे विशेष लक्ष देतील काय ? हा प्रश्न देखील आता होऊ लागला आहे, हे मात्र विशेष!

आता पुढे पुढे पाहू होणार तरी काय कोण कोण शोधणार कोणते उपाय?        ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ===============================               *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here