================================
आरोग्य हेच खरे धन
डॉ. मंगेश गुलवाडे* यांचे मार्गदर्शनाखाली बहुवैद्यकीय तपासण्या व औषधी वितरण
————————————————
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(का प्र) :- 18 मे 2025 रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, संत आंद्रेया चर्च आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली.शिबिरात खालील तपासण्या करण्यात आल्या:1. हृदय, कान-नाक-घसा, व त्वचाविकारांची तपासणी
2. रक्त तपासणी, थायरॉईड, हिमोग्लोबिन, सिकल सेल, लिव्हर व किडनी लॅबोरेटरी तपासण्या
3. स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, तोंडाचे आजार, स्तनातील गाठी व कॅन्सर तपासणी 4. मोफत औषधी वितरण
डा. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. त्यांनी समाजात आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला आणि प्रत्येक व्यक्तीने नियमित आरोग्य तपासणी करून रोग टाळावेत, असे आवाहन केले. सदर शिबिरात
डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. राजीव देवइकर, डॉ. सत्यनारायण दुधीवार , डॉ. बाल मुकुंद पालीवाल, डॉ. प्रियंका पालीवाल, डॉ. प्रदीप वरघणे, डॉ. आशिष बारब्दे, डॉ. ट्विंकल ढेंगळे, डॉ. पीयूष मेश्राम, डॉ. गार्गी (GMC), डॉ. दिक्षा (GMC), डॉ. अभिजीत (GMC) इत्यादी डॉक्टर्स आपले योगदान दिले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता
काजल विश्वास, नताशा देवघरे, वैष्णवी सहारे सुभाष मुरस्कर आरिफ शेख विनोद पातुर्डे यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिराद्वारे अनेक गरजू रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त असून भविष्यातही अशी उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356