Home
Home चंद्रपूर शिक्षण वाचवा-शाळा वाचवा मोहिमेचा एक दिवशीय शिबीराचे आयोजन.

शिक्षण वाचवा-शाळा वाचवा मोहिमेचा एक दिवशीय शिबीराचे आयोजन.

0
138

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर,(का. प्र.) : शासनाद्वारे अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्याकरीता शिक्षण वाचवा-शाळा वाचवा या मोहिमेच्या लोकप्रबोधनाकरीता अध्यक्ष, सचिव मंडळ शिक्षण बचाव समिती चंद्रपूर व लोकसंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने ब्राईट इंग्लिश स्कुल चंद्रपूर येथे २ नोव्हेंबर ला सकाळी १० ते ५ या वेळेत एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

    आधुनिक जगात समान मानवी प्रतिष्ठेने सर्वांना जगता येण्यासाठी सर्वांनाच आणि विशेषतः मागासवर्गीयांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी समान गुणवत्ता पातळीचे मोफत शिक्षण मिळावे असा आग्रह महामानव फुले-शाहू-आंबेडकरांनी धरलेला होता. भारतीय संविधानात याची तरतुद असतांनासुद्धा या विरोधी भुमीका शासन घेत आहे.

           गाव-खेड्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिक्षण वाचवा-शाळा वाचवा हि मोहिम राबविणे गरजेचे असून त्यासाठी व्यापक लोकप्रबोधन होण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

           या शिबीराचे उद्घाटन लोकसंघ सोशल मुव्हमेंट चे अध्यक्ष नरेश गेडाम यांच्या हस्ते होणार असून शिक्षण बचाव समन्वय समिती चे समन्वयक रमेश बीजेकर, सचिव मंडळ शिक्षण बचाव समन्वय समितीचे विदर्भ प्रतिनिधी अपेक्षा अमीन दिवाण, अध्यक्ष मंडळ शिक्षण बचाव समिती चे प्रभाकर गेडाम मार्गदर्शन करणार आहेत.

         या शिबीराला जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राण्याचे आवाहन अध्यक्ष, सचिव मंडळ शिक्षण बचाव समिती चंद्रपूर व लोकसंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने करण्यात आले आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here