Home Breaking News उप पोलीस स्टेशन धाबा ची अतुलनीय कामगिरी, गोवंश भरलेली बोलेरो पिकअप पकडून...
HELLO CHANDA NEWS
गोंडपिपरी,(का. प्र.) : पोलीस स्टेशन धाबा येथे 03/02/2026 रोजी पोलीस स्टेशन पोंभूर्णा येथील पोलीसावदारे माहिती मिळाली की , पो स्टे पोंभूर्ण हददीतून एका वाहनात अवैधरित्या गोवंश कोबून कत्तल तस्करीसाठी वाहतूक करीत असून सदर वाहनाचा पाठलाग करीत असताना वाहन हे विढढलवाडा मार्गे तेलंगणा राज्यात जात असल्याचे माहिती वरून ठाणेदार धमेन्द्र मडावी , पोहवा विजय मडावी , श्रावण कुत्तरमारे , अमोल कुळमेथे, चंद्रशेखर आसुडकर असे मिळून हिवरा फाटा येथे नाकेबंदी करून सदर वाहन ताब्यात घेऊन पंचा समक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये 10 नग गोवंशीय जनावरे , एक चारचाकी वाहननात जबरान कोंबून होते. वाहनात एकूण 8,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पण सदर गाडीचा चालक हा गाडी सोडून पळून गेल्याने शोध सुरु आहे व 10 नग गोवंशीय जनावरांना कत्तली पासून वाचविण्यात आले सदर कारवाई.
पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधिक्षक, इश्वर कातकाडे उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आमले उपविभाग मूल यांचे मार्गदर्शन मध्ये प्रभारी अधिकारी सपोनि धमेन्द्र मडावी यांचे उपस्थितित पोहवा विजय मडावी , श्रावण कुत्तरमारे , अमोल कुळमेथे, चंद्रशेखर आसुडकर उप पो स्टे धाबा तसेच पो स्टे पोंभूर्णा येथील पोलीस सपोनि राहूल ठेंगणे , अरविंद चुधरी , रजत रामटेके केली गुन्ह्याचा पुढील तपास उप पो स्टे धाबा यांनी करत आहे. 


*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*