HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) : रस्त्यावर चालताना येणारे अश्लील अनुभव असोत किंवा टवाळखोरांनी मारलेले टोमणे; आता महिलांना गप्प बसण्याची गरज नाही छेडछाड करणाऱ्या ‘रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारचे ‘शी बॉक्स’ पोर्टल आता नव्या अवतारात सज्ज झाले आहे.
केवळ कार्यालयीन छळाच नव्हे, तर रस्त्यावरील छेडछाडीची तक्रारही जाता एका क्लिकवर नोंदवता येणार असून, तुमची तक्रार मिळताच साध्या वेशातील पोलीस किंवा जवळच्या पोलिस ठाण्यातील पथक मदतीला धावून येईल. महिला सुरक्षेसाठी हे पोर्टल आता थेट देशातील कानाकोपन्यातील पोलीस ठाण्यांशी जोडले गेले आहे. त्यामुळे पीडितांकडून तक्रार गेल्यानंतर लगेच त्या संबंधित ठाण्याकडे आऊन ती सोडवली
आता रस्त्यावरील छेडछाडीचीही तक्रार !
पोर्टलच्या नवीन अपग्रेडेशननुसार, आता महिलांना सत्यात होणारी छेडछाड, अस्लील टोमणे, पाठलाग करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छळाचीही तक्रार नोंदविता येईल. घराबाहेर वावरताना सुरक्षितता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
काय आहे ‘शी-बॉक्स पोर्टल’?
महिला सुरक्षेसाठी हे घोर्टल आता वेट देशातौल कानाकोप-यातील पोलीस ठाण्यांशी जाते.
‘शी-बॉक्स हे महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेले एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. सुरुवातीला हे पोर्टल केवळ सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील लैंगिक छळवणुकीच्या तक्रारींसाठी मर्यादित होते. विशाखा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरले आहे.
पीडितांना मिळणार न्याय
बहुतेक प्रकरणातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. पोलीस विशेष मोहीम राबवित आहे.
कुठे आणि कशी करायची तक्रार?
तक्रार नोंदवण्यासाठी महिलांना shebox.wcd.gov.in या पोर्टलवर जाऊन ‘Register Your Complaint’ वर क्लिक करा. तिथे विचारलेली माहिती भरून तुम्ही तुमचा छळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध किंवा घटनेविरुद्ध आवाज उठवू शकता.
पोलिसांकडून मिळणार तत्काळ मदत
तक्रार प्राप्त होताच ‘रिअल-टाइम’ मॉनिटरिंगद्वारे स्थानिक पोलिसांना अलर्ट जाईल, गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांचे पश्थक तत्काळ घटनास्थळी पोहोचून पीडित महिलेशी संपर्क साधून तिला आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येईल.
देशातील सर्व पोलिस ठाण्यांशी जोडले जाणार.
हे पोर्टल आता देशातील सर्व राज्यांमधील स्थानिक पोलिस ठाण्यांशी (सीसीटीएनएस प्रणालीद्वारे) जोडले जात आहे.
यामुळे तक्रार नौदवताच ती थेट संबंधित क्षेत्रातील पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जाईल, ज्यामुळे तांत्रिक अडथळे दूर होऊन कामाला गती मिळेल.
रोडरोमियाचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे पथक तैनात आहे. प्रत्येक ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांचेही विशेष पथक आहे.
ते शाळा, कॉलेज महाविद्यालय परिसरावर लक्ष ठेऊन असतात. कुणीही छेडखानी करत असेल तर लगेच त्याची तक्रार करावी.
ईश्वर कातकडे, अप्पर पोलिस

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*























