Home
Home चंद्रपूर घुग्घुस येथील राजीव रतन चौक पुलाच्या कामाची आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी....

घुग्घुस येथील राजीव रतन चौक पुलाच्या कामाची आ. किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी. ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण; पुल लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

0
30

 HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(का.प्र.) घुग्घुस येथील राजीव रतन चौकात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा सविस्तर आढावा घेतला. पुलाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून सध्या पॅचवर्कअंतिम टप्प्यातील तांत्रिक कामे व इतर किरकोळ कामे शिल्लक आहे.

   हे काम तातडीने पूर्ण करून पुलीया रहदारिकारिता लवकर सुरु करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांना दिले आहे.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश राजनकर, वणी वेकोली एरियाचे म करमरकरमहारेलचे श्रीकांत पंचवटीसार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोडभारतीय जनता पार्टीचे घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारीघुग्घुस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्केगटनेत्या मीना मोरपाकानगरसेवक विवेक बोढेआशिष मासिरकरगणेश पिंपळकरराजू रेड्डीनगर सेविका वैशाली ढवस,आशा पानघाटे, पल्लवी घुले, सुनीता पेंदोर,  स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नरुल सिद्दिकी, नगर  बलराम डोडाणीतुषार सोमशेखर शेट्टीनामदेव डाहुलेगणेश शेंडेसंतोष नुनेमुन्ना लोडेविनोद चौधरीपूजा दुग्गमश्रीनिवास इसारपराजकुमार गोडसेलवारसाजन गोहणेभाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुचिता लुटेउषा अगदारीसोनल भरटकर, नंदकिशोर यादव, चैताली सातपुते, रमन तांड्रा, राजपाल वर्मा, ओम महाकाली, राजेश मोरपाका, श्रीनिवास तालपेल्ली, सुनीता पाठील, लखन हेकरे, संजय वखाले, गणेश उईके, गौरव ठाकरे, मयूर कलवल, श्याम अगदारी, सुरज मोरपाका, तुळशीराम ढवस आदींची उपस्थिती होती.

चंद्रपूर मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम ठेवत नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयी अधिक सक्षम करण्यासाठी हा पुल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना सुरक्षितजलद व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 

पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्तावापरण्यात आलेले साहित्यसुरक्षा उपाययोजनावाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तसेच कामाची सद्यस्थिती याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नयेयाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

 

यावेळी पुलावरील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देतपुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावाअसे स्पष्ट निर्देश आ. किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ट्रायल प्रक्रियेदरम्यान सर्व तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याचेही त्यांनी सांगितले.

 

तसेच परिसरातील नागरिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा त्रास होऊ नयेयासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावेअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देतमतदारसंघातील प्रत्येक महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 वेकोली अधिकारी व व्यापारी मंडळासह लोहा पुलाची पाहणी.

आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घुस येथील नागरिकांसमवेत लोहा पुलाची पाहणी केली. हा पुल सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील रहदारी अधिक सुलभ व सुरक्षित होण्यास मदत होईल. पुलाचे काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावे तसेच कामामध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नयेयासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

यावेळी वेकोलीचे अधिकारीकर्मचारी तसेच स्थानिक व्यापारी मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069**बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬* *shashithakkar2409@gmail.com*      *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here