Home चंद्रपूर स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी.

HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का.प्र.) : देशाला ब्रिटीशांच्या गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महान राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 28 मे 2026 रोजी या क्रांतिकारी सुपुत्रास अभिवादन करण्यात आले.
पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासस्थानातील जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या जयंती उत्सवात हंसराज अहीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतिस अभिवादन केले.
या कार्यक्रमास सावरकर विचारमंचाचे सन्माननिय पदाधिकारी तसेच भाजपा ज्येष्ठ नेते सर्वश्री खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजेंद्र अडपेवार, रघुवीर अहीर, रत्नाकर जैन, गिरीष अणे, पूनम तिवारी, राजु घरोटे, विकास खटी, राजु येले, संजय खनके, विनोद शेरकी, सचिन संदूरकर, सुदामा यादव, सुरेश भाकरे, पबित्र मंडल, प्रशांत घरोटे, अतुल रायकुंडलिया, देवेंद्र मालुसरे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या चिरंतन स्मृतिस आदरांजली वाहीली.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*