Home चंद्रपूर रोटरी क्लब वरोरा तर्फे ITI वरोरा येथे सेनेटरी पॅड वेंडिंग मशीनचे उद्घाटन...
HELLO CHANDA NEWS
वरोरा,(वि. प्र.) : महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब वरोरा तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), वरोरा येथे विद्यार्थिनींसाठी सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) वरोरा येथील प्राचार्य श्री. वीरेंद्र पोटदुखे हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक तेला उपस्थित होते.
सर्व प्रथम दिपपूजन करून भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या फोटो ला हार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. विवेक तेला यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.
रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष रोटेरियन योगेश डोंगरवार यांनी आपल्या मनोगतात रोटरीच्या सेवा कार्यांची माहिती देत विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सन्मानासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
प्रकल्प प्रमुख सौ. दीपाली माटे यांनी सेनेटरी पॅड वेंडिंग मशीनचे प्रात्यक्षिक सादर करून त्याचा वापर, देखभाल आणि विद्यार्थिनींना होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास इखे सर, दारव्हाणकर, रोटेरियन अदनान सद्दीकोट, अभिजित बोथले, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) चे शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थिनी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी क्लब वरोरा सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व आत्मविश्वास वृद्धीसाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
“सुरक्षित आरोग्य, स्वच्छता आणि आत्मविश्वास — प्रत्येक मुलीचा अधिकार!”

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*