४८ तासाच्या आत जोगापूर मंदिर परिसरात २.५० लाख रु. चे सोलर लाईट उपलब्ध
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हनुमान मंदिरामध्ये महाआरती करून जोगापूर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेत असताना दहा सोलर लाईट ४८ तासाच्या आत मंदिर परिसरामध्ये उभारुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वनविभागाला दिले. त्यानुसार ४८ तासाच्या आत जोगापूर मंदिर परिसरामध्ये सोलर लाईट उभारण्यात आले.
दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी राजुरा शहरा लगत असलेल्या जोगापूर मंदिर येथे श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाआरती करुन यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा प्रत्येक वर्षी मार्गशिर्ष महिन्यामध्ये असते. सदर कार्यक्रमाचे आयोजन वनविभाग व स्थानिय भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने माजी आ. सुदर्शन निमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल उरकुडे, टेंभुरवाही गावचे सरपंच रामकृष्ण मडावी, उपसरपंच रमेश गौरकार, अरुण मस्की, सतिश धोटे, हरिभाऊ झाडे, सचिन डोहे, दिलीप वांढरे, दिपक झाडे, सतिश कोमतपल्लीवार, सचिन शेंडे, उज्वला जयपूरकर, शितल वाटेकर, शुभांगी रागीट, प्रियदर्शनी उमरे, स्वाती देशपांडे, टेंभुरवाहीचे ग्रामसेवक अमोल बदखल, पोलिस पाटील विनोद खनके, वनविभागाचे कर्मचारी व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिराला आवश्यक असणा-या पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन लाईट व्यवस्था उपलब्ध नसल्याने वनविभागाला ४८ तासाच्या आत सोलर लाईट उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिल. त्यानुसार वनविभागाने ४८ तासाच्या आत मंदिर परिसरामध्ये २.५० लाख रुपयांच्या १० सोलर लाईटची उभारणी केली. ‘दिला शब्द केला पूर्ण’ ही ख्याती असलेल्या श्री. मुनगंटीवार यांनी यावेळीही जपली. मंदिराची स्वच्छता, प्लॉस्टीक मुक्त परिसर, यात्रेकरीता येणा-या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793