Home
Home चंद्रपूर *सिनेस्टाईल पद्धतीने भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे (भारत एकता मिशन) यांना...

*सिनेस्टाईल पद्धतीने भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे (भारत एकता मिशन) यांना पाेलिसांनी केली अटक.*

0
107

***************************

चंद्रपुर –
संभाजी भिडे हा चंद्रपूर ला येणार आणि भिम आर्मी तर्फे महत्वाची आक्रमक भूमिका बजावली जाणार या भीतीने भीम आर्मीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे यांचा त्यांच्या राहत्या घरापासून सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करीत आंबेडकर कॉलेज चंद्रपूर इथे सकाळी 8:15 मिनिटाने चंद्रपुर पाेलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस मुख्यालय येथिल ग्रीनशेड इथे नजर बंद करण्यात आले. सुरेंद्रभाऊ यांना प्रतिक्रिया देतांना सांगितले कि भिडे च्या कार्यक्रमांस पोलीस प्रशासनाने ज्या प्रमाणे त्यांना सौरक्षण दिले होते त्यानुसार तो कार्यक्रम शिव प्रतिष्ठानचा नसून शासकीय यंत्रनेच्या मोठ्या अधिकाऱ्याचाच आहे. भिडे हा नेहमी जातीय तेढनिर्मितेचे कार्य करून जातीय दंगली घडवून आणतो, महिलांचा अवमान, तिरंग्याचा अवमान करनारे व्यक्तव्य करतो त्यामुळे त्यासं देशद्रोही ठरवित त्याच्या भारतात कुठेही सभा लावू देण्यात येवु नये अशी मांगणी सुरेंद्रभाऊ रायपुरे यांनी केली. सदर प्रकरणात आवाज़ संघटनेचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष निलेश ठाकरे तसेच आंबेडकरी चळवळीतील कमलेश रामटेके, ब्रिजेश तामगडे, संघप्रकाश ठमके,अमर रामटेके, संतोष साखरकर, शशिकांत निरंजणे, अमर धोंगडे यांनी शाब्दिक निषेध नोंदवीला. यावेळेस ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने भिडे यांच्या कार्यक्रम स्थळी जाणार्या मार्गावर उपस्थित राहुन पुरूष /महिला सैनिकांनी सुध्दा आपला निषेध आंदाेलनात आपला सहभाग दिला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशेष आभार मानले कारण ते तिथे पोहचू शकले आणि जो विरोध व्हायला हवा होता तो त्यांनी प्रदर्शित केला. संविधानाचा अपमान करणारा अश्या धार्मिक जातिय दंगली घडवण्यास विस ते बावीस वर्षांच्या युवकांना प्रवृत्त करणार्या भिडेना सत्ताधारी पक्ष व पाेलिस प्रशासन सुरक्षा प्रदान करते यांची मात्र खंत यावेळेस भीम आर्मी चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी न्युज चँनलला प्रतीक्रिया देतांना केली ,

********************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here