=====================
प्रशिक्षीत महिलांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप
====================
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील जलनगर वार्ड येथील इराणी सभागृह येथे आयोजित एक महिना चाललेल्या शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रशिक्षीत महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशिक्षण शिबिर आयोजित करणा-या यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्यांक विभागाच्या महिला शहर अध्यक्षा कौसर खान, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहराध्यक्षा सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, यांच्यासह शिया ईशान आश्री संस्थेचे अध्यक्ष मोईनुद्दीन हुसैन, सचिव अमजद अली, माजी नगरसेवक धनराज सावरकर, हिमायू अली, डब्ल्यूसीएल सेवानिवृत्त स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त चंद्रप्रभा रामटेक, अधिवक्ता हुसैना हिमायू अली, फॅशन डिझायनर मनीषा अग्रवाल, सरोज चांदेकर, आशा देशमुख, वंदना हजारे, रुबिना शेख, ताहेरा अली, रेश्मा अली, शहनाज अली, सोफिया अली, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात स्वयंरोजगारा संदर्भातील विविध प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. या शिबिरांच्या माध्यमातून जवळपास अडीच हजार महिलांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. यात ब्युटी पार्लर, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग यासह इतर प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जात आहे. नुकतचे बाबुपेठ आणि दादमहल येथील ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे समारोप करण्यात आले आहे.
दरम्यान जलनगर वार्डात शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. एक महिना चाललेल्या या शिबिराचा समारोप करण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रशिक्षीत महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांनी प्रशिक्षण घेतल्या नंतर स्वत:चा रोजगार उभारावा आर्थिक सक्षम होत आत्मनिर्भर व्हावे असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. या प्रशिक्षण शिबिरात शिलाई, कपडा कापणे, फॅशन डिजाईन, आदी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी महिलांसह स्थानिक नागरिक व यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793





















