*चंद्रपूर ते सिरोंचा – सिरोंचा ते चंद्रपूर चालणा-या लालपरीच्या वेळेत बदल करावे*

0
36

=========================

*भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावारांची विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

===========================

            चंद्रपूर :-

====≠======================

चंद्रपूर ते सिरोंचा – सिरोंचा ते चंद्रपूर
चालणा-या लालपरीच्या वेळेत बदल करण्यात यावे अशी मागणी भाजयुमो महानगर जिल्हाकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

=========================

सदर निवेदनात महेश कोलावार यांनी म्हणाले की दि.१० जानेवारी २०२४ पासून चंद्रपूर ते सिरोंचा – सिरोंचा ते चंद्रपूर या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे लालपरीची सेवा सुरू करण्यात आली होती.तर सदर लालपरीची नियोजित वेळ चंद्रपूर ते सिरोंचा स.७ वाजता व दु.२ वाजता आणि सिरोंचा ते चंद्रपूर स.७ वाजता व दु.१ वाजताच्या दरम्यान असल्याने दोन्ही शहरातील प्रवाश्यांना शासकीय व खाजगी कामनिमित्त ये-जा करतांना नियोजित वेळेच्या आत कामे आटोपून परतीच्या प्रवासाला परततांना वेळेच्या बंधनामुळे लालपरीची सुविधा मिळत नसल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावे लागत असल्याची माहिती मिळाली आहे,

========================

या माहितीच्या आधारे महेश कोलावार यांनी
विभागीय वाहतूक अधिकारी पुरूषोत्तम व्यवहारे यांची सदिच्छा भेट घेत त्या नियोजित वेळेत बदल करून चंद्रपूर ते सिरोंचा स.७.४५ व दु.३ आणि सिरोंचा ते चंद्रपूर स.६ व दु.३ वाजताच्या दरम्यान लालपरी सेवा सुरू करण्याची मागणी केली असता यावर विभागीय वाहतूक अधिकारी म्हणाले की सदर प्रवासाच्या वेळेची आपण ६ महिण्याची परमीट घेतली असल्याने सध्यास्थितीत काहीही करू शकत नाही.तर सहा महिण्याचा कालावधी संपल्यानंतर परत परमीट काढतांना सदर वेळेत बदल करवून घेऊ व त्याप्रकारे लालपरी सुरू करू अशी ग्वाही पुरूषोत्तम व्यवहारे यांनी यावेळी महेश कोलावार यांना दिली.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here