मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेऊन १३ दिवस उलटले. त्यांनतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. दरम्यान, या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आज झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या किंमतीसंदर्भात अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. तर, दुसरीकडे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल डिझेलच्या दरासंदर्भात केलेल्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोलचे दर 5 रुपये तर डिझेलचे दर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय आज कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार असून पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार असल्याचा अंदाज आहे.
संपादक शशि ठक्कर