झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झालेल्या पिडीत कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आर्थिक मदत

0
34

झाड कोसळल्याने घरांचे नुकसान झाल्याची घटना आज रयतवारी काॅलरी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर परिसर गाठत नुकसान झालेल्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, माजी नगर सेवक राजेश रेवल्लीवार, शंकर दंतुलवार आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूरात पावसाचा जोर मंदावला असला तरी या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. अशा कुटुंबीयांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केल्या जात आहे. दरम्यान आज कडूलिंबाचे झाड कोसळल्याने रयतवारी येथील सुरेश सदनलवार, राजु झंजलवार, शुभम पोतनवार आणि सुरज अडपेवार यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी रयतवारी काॅलरी परिसरात जात सदर नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी घटनेची पाहणी करत सदर कुटुंबीयांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच प्रशासनातर्फेही सदर कुटुंबीयांना आर्थिक

मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here