श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची उमेदवारी कर्तृत्व बघूनच….डॉ मंगेश गुलवाडे. विजयासाठी महानगर व ग्रामीण भाजपाचे ‘विजय संकल्प अनुष्ठान’…. भाजपा अनुसूचित मोर्चाचा पुढाकार

0
48
भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजातील प्रतिभावान व्यक्तिमत्व असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली.ही उमेदवारी त्यांचे कर्तृत्व बघून देण्यात आली आहे.त्यांचा विजय अटळ आहे,असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना विजय मिळावा म्हणून महानगर व ग्रामीण भाजपा तर्फे महाकाली मंदिर येथे लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार विजय संकल्प अनुष्ठान कार्यक्रमात सोमवार 18 जुलैला बोलत होते.
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या पुढाकारातून झालेल्या या धार्मिक अनुष्ठान कार्यक्रमात  भाजपा ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,
महिला मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्ष सौ. अंजलीताई घोटेकर, आदिवासी आघाडी अध्यक्ष धनराज कोवे,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महामंत्री रविंद्र गुरनूले, आत्मनिर्भर भारत अभियानाचे संयोजिका सौ. किरणताई बुटले, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष रुद्रनारायण तिवारी यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.
विजय संकल्प अनुष्ठान पूजा विधी झाल्यानंतर माता महाकालीची महाआरती करण्यात आली.यावेळी भजपा नेते चंद्रकला सोयाम, मायाताई उइके,प्रदीप किरमे,ज्योती गेडाम,ओबीसी आघाडी अध्यक्ष विनोद शेरकी,प्रलय सरकार,शुभम गेडाम, अमित निरंजने, नितीन कारिया,विक्की मेश्राम ऍंड हरीश गेडाम,अशोक आलाम,अरविंद मडावी,यशवंत सिडाम,रंजना किन्नाके,रेखाताई मडावी,शीतल आत्राम,शीतल कुळमेथे
सीमाताई मडावी, अनिता पुसाम, देविदास गेडाम, गीता धर्माजी गेडाम, सपना सोयाम, विकास पेंद्राम, शिला सुंदर पेंदोर,भाग्यश्री कुळमेथे, प्रतिभा विलास शेडमाके, प्रतिभा शेडमाके, अनिता कोडापे,मीनाक्षी कोयाम, शालू कोडापे, अंजली कानगुन.यांच्यासह भाजपा महानगर पदाधिकारी व भाजपा आदिवासी आघाडी पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here