Home
Home Breaking News आज दिनांक 19/07/2022 रोजी चं.महा.औ.वीज केंद्राचे मुख्य व्यवस्थापक मा. सपाटे साहेब व...

आज दिनांक 19/07/2022 रोजी चं.महा.औ.वीज केंद्राचे मुख्य व्यवस्थापक मा. सपाटे साहेब व संबंधित अधिकारी यांचे सोबत आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सूचनेनुसार इरई धरणाच्या पाण्यामुळे पुरपीडित भागातील समस्या व त्याचे निराकरण करणे पुरपीडित गावांसाठी किराणा किट तसेच गरजू पुरपीडितांना ताडपत्री पुरवठा करणे

0
157
आज दिनांक 19/07/2022 रोजी चं.महा.औ.वीज केंद्राचे मुख्य व्यवस्थापक मा. सपाटे साहेब व संबंधित अधिकारी यांचे सोबत आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सूचनेनुसार इरई धरणाच्या पाण्यामुळे  पुरपीडित भागातील समस्या व त्याचे  निराकरण करणे पुरपीडित गावांसाठी किराणा किट तसेच गरजू पुरपीडितांना ताडपत्री पुरवठा करणे. पंचनाम्या नुसार पुरपीडितांना आर्थिक स्वरूपात मदत करणे,  CTPS अधिनस्त, व पुरामुळे गावांतर्गत रस्ते नालीचे   काम करणे, यासंबंधी चं.महा.औ.वीज केंद्राकडून action plan तयार करण्यासंबंधी तसेच मागील 100 कोटी निधी अंतर्गत झालेल्या व नं झालेल्या कामाचे आढावा घेण्यात आला.  भविष्यात नेरी येथील संपूर्ण नाल्याचे अस्तरीकरण,  नेरी येथील  रोप वे ऐवजी  कॉन्व्हेअर बेल्ट चे काम करणे, सामाजिक सभागृह करीता जागा उपलब्द करून बांधकाम करणे, पीक अप शेड, चारगाव Ash Bund  पर्यंत काँक्रेट रस्ता बांधकाम,  ऊर्जानगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रेट करणे,  ऊर्जानगर येथील बागबगीचे देखभाल व व्यवस्थापन करणे.   इत्यादी तसेच इत्यादी नव्याने कामे सुचविण्यात आली असून याबाबतीत बैठकीचे वृत्तांत तयार करून वरील कामे व पूर्ण करण्याची कालमर्यादा ठरवून तसे वृत्तांत चं.महा.औ.वीज केंद्राने द्यावे असेही बैठकीत ठरले.
या बैठकीला भाजपा चे नेते मा. रामपाल सिंग,  ऊर्जानगर माजी जि. प. सदस्य शांताराम चौखे तसेच तिरावंजा मोकासाचे सरपंच प्रशांत कोपूला प्रामुख्याने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here