घोडाझरीच्या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची धूम ; वीकेंडला वाढणार आणखी गर्दी

0
125

तीन वर्षांनंतर घोडाझरी झाला ओव्हरफ्लो
नागभीड ( चंद्रपूर ) : घोडाझरी तलाव तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची याठिकाणी गर्दी वाढली आहे . बुधवारी शेकडो पर्यटकांनी हजेरी लावून ओव्हरफ्लोचा आनंद लुटला . २०१ ९ मध्ये हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता , मागील वर्षीही हा तलाव ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला होता . पण पुरेशा पावसाअभावी ओव्हरफ्लो झाला नाही . परिणामी , पर्यटकांचा हिरमोड झाला . यावर्षी प्रथमच दमदार पाऊस पडल्याने १ ९ जुलैला तीन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाला आणि या ओव्हरफ्लोचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी करणे सुरू केले आहे . बुधवारी तर या ओव्हरफ्लोवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी यापेक्षा राहील , असा अंदाज आहे . पर्यटकांचा हा ओघ लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त लावण्याची गरज व्यक्त होत आहे .
तिन्ही बजुला असलेल्या नैसर्गिक टेकड्यांना मध्ये बांध घालून इंग्रजांनी १ ९ ०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली . निसर्गाने या तलावावर नैसर्गिक सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे . निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वर्षभर येथे गर्दी करीत असतात . पण ओव्हरफ्लोच्या फेसाळलेल्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याची मजा पावसाळ्यातच असते . चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्व विदर्भातील नागपूर , भंडारा , गोंदिया या जिल्ह्यातील पर्यटकही येथे येतात .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here