पोंभुर्णा शहरातील सिमेंट रस्‍ते बांधकामासाठी १ कोटी रू. निधी उपलब्‍ध माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

0
38

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात १ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली आहे. नगरविकास विभागाच्‍या दिनांक ७ जुलै २०२२ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये या निधीला मान्‍यता देण्‍यात आली आहे.

 

पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात श्री. आत्‍माराम उराडे यांच्‍या घरापासून श्रीकृष्‍ण कॉलेजपर्यंत तसेच श्री. थवरदास भसारकर यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यासाठी १५ लक्ष रू., श्री. वासुदेव नैताम यांच्‍या घरापासून श्री. चलाख यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यासाठी १० लक्ष रू., प्रभाग क्र. १० मधील नाला ते हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यासाठी २० लक्ष रू., श्री. सुरेश कपाट यांच्‍या घरापासून श्री. भांडारवार यांच्‍या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यासाठी ४० लक्ष रू., वनविभागाच्‍या कार्यापासून पब्‍लीक स्‍कुलपर्यंत बंदिस्‍त नालीचे बांधकाम करण्‍यासाठी १५ लक्ष रू. असा एकूण १ कोटी रू. निधी पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रातील विकासकामांसाठी ७ जुलै २०२२ च्‍या शासन निर्णयाद्वारे वितरीत करण्‍यात आला आहे.

 

याआधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात अमेरीकेच्‍या व्‍हाईट हाऊसची प्रतिकृती असलेली पोंभुर्णा नगर पंचायतीची देखण्‍या इमारतीचे बांधकाम करण्‍यात आले आहे. तसेच पोंभुर्णा शहरात पंचायत समिती, तहसिलदार कार्यालयाच्‍या इमारतीचे बांधकाम, ग्रामीण रूग्‍णालयाची निर्मीती, टूथपिक उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम, वनविश्रामगृहाचे बांधकाम, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, पाणी स्‍वच्‍छता पार्कचे बांधकाम, महिलांसाठी अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, अत्‍याधुनिक स्‍टेडियमचे बांधकाम, रस्‍त्‍याच्‍या लगत विद्युत खांबावर एलईडी पथदिवे, डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम, श्री राजराजेश्‍वर मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण, मुख्‍य रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण, दुभाजकाचे बांधकाम व पथदिवे बसविण्‍याचे काम, बस स्‍थानकाच्‍या बांधकाम, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची निर्मीती, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे नुतनीकरण, पाणी पुरवठा योजना, तलावाचे सौंदर्यीकरण, संताजी जगनाडे महाराज सभागृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, खुल्‍या नाटयगृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, पिण्‍याचे शुध्‍द पाणीसाठी आरो प्‍लॅन्‍ट, अंगणवाडी व शाळा नुतनीकरण, ई-लर्निंगची सोय, रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम, आदिवासी भगिनींची राज्‍यातील पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था पोंभुर्णा येथे अस्तित्‍वात आणली. पोंभुर्णासाठी स्‍वतंत्र एमआयडीसी स्‍थापना करून महिलांसाठी सुक्ष्‍म उद्योग उभरण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशील, महिला आर्थीक विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातुन कारपेट तयार करण्‍याचे केंद्र, आठवडी बाजारासाठी बांधकाम अशी विविध विकासकामे करण्‍यात आली आहे.

 

दिनांक ७ जुलै २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये उपलब्‍ध होणा-या १ कोटी रू. निधीतुन शहरातील नागरिकांच्‍या जिव्‍हाळयाच्‍या रस्‍त्‍याच्‍या मागण्‍यांची पूर्तता होत आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here