शिंदे गटाला मनसेत विलीन करण्याचा प्रस्ताव आल्याम विचार करू राज ठाकरे –

0
60

मुंबई – शिवसेना पक्षात ( Shivsena ) फूट पडल्यानंतर एकूण ४० आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत . या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे . दुसरीकडे राज्यात शिंदे सरकार ( Shinde Government ) स्थापन झाले तरी कायद्याच्या कसोटीवर हे सरकार टिकेल का ? अशी विचारणा केली जात आहे . सरकार अबाधित ठेवायचे असेल तर शिंदे गटाला कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन व्हावे लागेल , असा दावा केला जात आहे . दरम्यान , शिंदे गटाने मनसे ( MNS ) पक्षात विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर विचार करू , असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी म्हटले आहे .
” हे शिवसेनेचे बंडखोर आमदार माझे जुने सहकारी आहेत . याआधीही त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे . मला याबाबत तांत्रिक माहिती नाही . पण उद्या त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन , असे म्हणत माझ्यासाठी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा महाराष्ट्र सैनिक असेल . बाकी सगळे नंतर येतील , असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले .
” मी बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनाही पत्र लिहिले होते . मी एकच विचारत होतो की , माझे काम काय आहे ? तुम्ही इतरावर जबाबदारी द्याल आणि मला निवडणुकीच्या भाषणासाठी बाहेर काढणार . माझा शब्द इतरांच्या जीवावर घालणे मला शक्य नव्हते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय होता . महाबळेश्वरला असताना मी म्हणालो की तुमच्या मनात काय आहे ते मला माहीत आहे . उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करा . पण मला जाहीर करू द्या . कारण राज की उद्धव ( Udhhav Thackeray ) हा मुद्दा बंद होईल . म्हणून मी विषय बंद केला , असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here