चंद्रपूर : एका 28 वर्षीय युवकाने आईला स्व : त विष प्राशन करीत असल्याची माहिती देऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच आज शुक्रवारी घडली . रितेश विनोद भोयर असे मृतकाचे नाव असून चिमूर तालुक्यातील सुगत कुटी समोरील मुख्य रत्यावर उभ्या असलेल्या बारा चाकी ट्रक मध्ये मृतकाचा केबिनमध्ये मृतदेह आढळून आला आहे .
शुक्रवारी रोजी पो.स्टे . चिमुर अंतर्गत मौजा मालेवाडा येथील सुगत कुटी समोरील मेनरोडचे बाजुला उभ्या असलेल्या 12 चाकी महिंद्रा ब्लाजो क्रमांक TS – 01 UC – 0265 या ट्रकचे कॅबीनमधील ड्रायव्हर सिटचे पाठीमागे चालक रितेश विनोद भोयर वय अंदाजे 28 वर्ष , रा . पारडी ता . कोरपना जि . चंद्रपूर याचे प्रेत मिळुन आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मागील दिड महिण्यापासुन खान ट्रान्सपोर्ट लाजीस्टीक आदीलाबाद यांच्या कंपनीमध्ये मृतक रितेश विनोद भोयर हा ट्रक चालक म्हणून कार्यरत होता . 16 जुलै 2022 रोजी मृतक हा ट्रकद्वारे सिमेंट घेऊन दुसऱ्या दिवशी पोहचला होता . संततधार पावसामुळे ट्रक खाली न झाल्याने दोन दिवस भंडारा त्याचा मुक्काम राहीला . काल 20 जुलै 22 ला सकाळी च्या सुमारास त्याचा सिमेंटने भरलेला ट्रक खाली झाल्याने तो भंडारा येथून चिमुर मार्गे मुकुटबनकडे परत निघला होता . दुपारी अडीच्या सुमारास तयाने आईला मोबाईलद्वारे फोन करुन आपण विष पित असल्याची माहिती दिली . मोबाईल बंद केला . सदर माहितीवरुन फिर्यादी प्रफुल शामराव गेडेकर रा . नगराळा ता . जिवती जि . चंद्रपूर तसेच मृतकच्या मित्रांनी शोध घेतला असताना आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास चूिर तालुक्यातील मालेवाडा येथील सुगत कुटीचे समोरील रोडचे बाजुला उभ्या असलेल्या 12 चाकी महिंद्रा ब्लाजो क्रमांक टिएस 01 युसी 0265 या ट्रकचे कॅबीनमध्ये चालकाचे सिट मागे त्याचा मृतदेह आढळून आला . त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची फोस्कील नावाची विषारी औषधाची बॉटल आढळून आली आहे . सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता , मृतकाच्या तोंडातुन पांढऱ्या रंगाचा फेस निघत असल्याचे दिसुन आले . पोलिसानी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालय , चिमुर येथे पाठविले असून घटनेची नोंद घेण्यात आली आहे . मात्र त्यांने आईल सांगून विष प्राशन करून जिवनयात्रा का संपविली या उलगडा झालेला नाही .
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793