स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र दिनी विविध ठिकाणी ध्वजारोहण विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप

0
49

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त  शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अंतर्गत प्रत्येक घरी तिरंगा हा उपक्रमही संपुर्ण देशात राबविण्यात आला.  यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनीही मतदार संघातील चंद्रपूर येथे १०० तर  घुग्घुस येथे ७५ फूट उंचीचा तिरंगाध्वज उभारण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळता केला आहे.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरातील प्रत्येक वार्डात १५ ऑगस्टला  राष्ट्रध्वज फडकविण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्यानुसार आज  यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर शहरातील प्रत्येक वार्डात  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. झेंडा वंदन होताच राष्ट्रध्वजला सलामी देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी येथे विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचेही वाटप करण्यात करण्यात आले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here