मैदानावर पोलिस भरतीचा सराव करत असलेल्या युवक युवतींसाठी तज्ञ प्रशिक्षकांची नेमणुक करणार – आ. किशोर जोरगेवार

0
32

विसापूर येथील बीपीईडी मैदानावरील सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेटविद्यार्थ्यांना केले प्रोत्साहीत

आवश्यक सोयी सुविधांसह साहित्य पुरवीणार,

शिंदे – फडणवीस सरकारणे महाराष्ट्रात भव्य पोलिस भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत चंद्रपूरातील अधिकाधीक युवक युवतींनी उत्तीर्ण व्हावे. यात त्यांना येणा-र्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनीधी म्हणून मी कटिबध्द आहे. मैदानावर सराव करतांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे युवक युवती पोलिस भरतीचा सराव करत असलेल्या मैदानावर आवश्यक असल्यास आपण स्वखर्चातुन तज्ञ प्रशिक्षकांची नेमणुक करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असुन वीसापूर येथील बीपीईडी ग्राउंडवर प्रशिक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी विसापूर येथील बीपीईडी कॉलेजच्या मैदानावर भेट दिली. यावेळी येथे पोलिस भरतीसाठी सराव करत असलेल्या युवक युवतींशी संवाद साधतांना तें बोलत होते. यावेळी त्यांनी येथील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवीत येथे आवश्यक त्या सोयी सुविधा व साहित्य उपलब्ध करुन देण्याचे म्हटले आहे. यावेळी बीपीईडी कॉलेजच्या संचालकांसह शिक्षकांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, ही मेघा पोलिस भरती आहे. यात चंद्रपूरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होत यश प्राप्त करावे. चंद्रपूर आणि विसापूर येथील मैदानात युवक युवती मोठ्या संख्येने सराव करण्यासाठी येत आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते निराश होत आहे. त्यामुळे जिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी पोलिस भरतीचा मैदानी सराव करत आहे. त्या ठिकाणी आपण आवश्यक असल्यास स्वर्खचातुन प्रशिक्षक नियुक्त करणार आहोत. असा प्रशिक्षक विद्यार्थ्यांच्या लक्षात असेल तर त्यांनीही कळवावा त्याच्या मानधनाची व्यवस्था आपण करु असे यावेळी आ. किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यानंतर येथे लाईट व्यवस्था करण्यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी विसापूरच्या सरपंच यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधत लाईट व्यवस्था करण्याच्या सुचना केल्या. तसेच येथे घास कटर मशीन, रोड रोलर, लोखंडी गोळा यासह इतर साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सुचना यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांना केल्या आहे. त्यानुसार बुधवारी येथे हे सर्व साहित्य उपलब्ध होणार आहे. तर येथे प्रशिक्षकाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी नेमणुक केली आहे. पोलिस भरतीत युवक युवतींना येणा-र्या अडचणी सोडविल्या जातील त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ञांची नेमणुक केली जाईल असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. या प्रसंगी पोलिस भरतीचा सराव करत असलेल्या शेकडो युवक युवतींची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here