*बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे* *संतप्त गावकऱ्यांची मागणी*

0
44

 

कोरपना :-

तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोलामगुडा येथील रहिवाशी असलेल्या नितीन आत्राम या 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या घटनेमुळे गावामध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात यावे आणि जामगावला वनविभागाने संरक्षण द्यावे, मृत बालकाच्या कुटुंबातील एक व्यक्तीला वनविभागात नोकरी देण्यात यावी, गावामध्ये विधुत विजेची व्यवस्था करण्यात यावी, शेतकऱ्यांना झटका मशीन पुरवण्यात यावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन गावकऱ्यांनी वनविभागाचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले असता दिले.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांनी घटनास्थळी जाऊन वनविभागाला गावाकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती केली अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला, व गावकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन राज्याचे वन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असल्याच मत व्यक्त केल.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेडमाके, भारत सिडाम, सरपंच विनोद जुमनाके, माजी सरपंच विमलबाई कुळमेथे, नितीन बावणे, संकेत कुळमेथे उपस्थित होते.

=≠===================

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here