* आंबेधानोरा (ता. पोंभुर्णा) येथे भव्‍य नेत्र चिकित्‍सा शिबिर संपन्‍न *

0
97

 

* श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम. *

==========÷================

निसर्गातील इंद्रधनुष्‍यी रंग आपल्‍या सुंदर डोळ्यांनी कायम बघता यावे याकरीता डोळ्यांची निगा राखणे गरजेचे असते. ग्रामीण भागामध्‍ये गोरगरीब गरीबीमुळे वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करु शकत नाही. गोरगरीबांचे डोळे सुध्‍दा सुदृढ असले पाहिजे आणि हे सुंदर जग आपल्‍या डोळ्यांनी बघता आले पाहिजे. याकरीता आदिवासी बहुल व विशेषतः ग्रामीण भागामध्‍ये राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सातत्‍याने श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा आरोग्‍य शिबिरांचे वेळोवेळी यशस्वी नियोजन करुन रुग्‍ण सेवेचे व्रत जोपासण्‍यात येते आहे.

दि. ३१ डिसें. २०२२ रोजी आंबेधानोरा ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथे भव्‍य नेत्र चिकित्‍सा शिबिराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबिराचे अध्‍यक्ष स्‍थानी माजी आमदार अतुल देशकर तर उद्घाटक पंचायत समिती पोंभुर्णा माजी सभापती कु. अल्‍का आत्राम लाभले होते. यावेळी शैलेंद्रसिंह बैस, राहुल संतोषवार, डॉ. चौधरी, आंबेधानोराचे सरपंच निरंजना मडावी, उपसरपंच रमेश हनमलवार, ग्रामपंचायत सदस्‍य सुमित्रा जुमनाके, छाया जनगनवार, हरिश ढवस, ओमदेव पाल, जनार्धन लेनगुरे, मंगेश उपरे, जयंत पिंपळशेंडे, खुशाल रायसिडाम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या शिबिराचा लाभ १५०० नागरिकांनी घेतला. ४०० नागरिकांना चष्‍म्‍यांचे वाटप करण्‍यात येणार आहे, तर ४० नागरिकांना नेत्र शस्‍त्रक्रियेसाठी कस्‍तुरबा हॉस्‍पीटल सेवाग्राम, वर्धा येथे पाठविण्‍यात आले आहे. आजपर्यंत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रामध्‍ये ४२ हजार नागरिकांनी नेत्र चिकित्‍सा शिबिराचा लाभ घेतला आहे.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============÷÷÷÷=÷====

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here