* वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या आदेशानुसार ब्रम्हपुरी परिसरातील नरभक्षक वाघ जेरबंद *

0
54

ब्रम्‍हपूरी वनपरिक्षेत्रातांतर्गत शेतात काम करत असताना शुक्रवार व शनिवारला दोन किलोमीटर परिसराच्‍या आत दोन महिलांचा वाघाने बळी घेतला. त्‍यामुळे नरभक्षक वाघाला जेरबंद करण्‍याचे आदेश राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्‍यानुसार तोरगांव बुज. परिसरामध्‍ये वनविभागाने रेस्‍क्‍यु ऑपरेशन राबवून नरभक्षक वाघाला जेरबंद केले.

दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२२ रोजी ब्रम्‍हपूरी वनपरिक्षेत्राअंतर्गत शेतात काम करायला गेलेल्‍या सिताबाई रामजी सलामे रा. तोरगांव बुज. (ता. ब्रम्‍हपूरी) तर ब्रम्‍हपूरी-नागभीड सिमेलगत असलेल्‍या टेकरीजवळ नर्मदा प्रकाश भोयर या महिलेस वाघाने ठार केले. त्‍यामुळे घटनेची माहिती मिळताच श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाला नरभक्षक वाघाला तात्‍काळ जेरबंद करण्‍याचे आदेश दिले. त्‍यानुसार दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी तोरगांव बुज. येथे नरभक्षक वाघाला वनविभागाद्वारे जेरबंद करण्‍यात आले. नरभक्षक वाघाला जेरबंद केल्‍याबद्दल माजी आमदार अतुल देशकर यांनी वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे व वनविभागाच्‍या अधिकारी तसेच कर्मचा-यांचे आभार मानले आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here