Home
Home Breaking News चंद्रपुरात प्रवासी भरलेला ऑटोला भीषण अपघात;

चंद्रपुरात प्रवासी भरलेला ऑटोला भीषण अपघात;

0
110

=====================

*चंद्रपूर *  

====================

शहरातील बायपास मार्गावरील जुनोना चौकाकडून बंगाली कॅम्पकडे येणाऱ्या ऑटोला अपघात झाला. या मध्ये 4 जण ठार झाल्याचा अंदाज आहे. मात्र, 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनोना चौकातून बंगाली कॅम्पकडे येणारा आटो खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वाहनाला आदळला.

========================

जुनोना चौकातून 6 प्रवासी घेऊन ऑटो चालक बंगाली कॅम्पकडे निघाला होता. या मार्गावरील बिएनआर पूलावर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑटो चालकाने वळण घेतले. याचवेळी समोरून आलेल्या दुसऱ्या वाहनाला ऑटो जाऊन धडकला. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, 4 जण ठार झाल्याची आणि 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

====================≈===

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here