*भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ ताब्यात घ्या*

0
54

=====================

         *भद्रावती*

======================

*आप उपाध्यक्ष सुमित हस्तक यांची मांगणी.*

======================

भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणी येथे भगवान गौतम बुध्दाच्या प्राचीन मुर्ती आहेत. यापैकी वरील भागात असलेल्या एका मुर्तीला दि. 31 डिसेंबर 2023 चे रात्रीतून काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली आहे.

=========================

या प्रकरणी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी भद्रावती चे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे साहेब यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी म्हटले आहे की, भद्रावती शहरात नागरिक शांतताप्रिय, जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करणारे आहेत. परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई करून दोषींना अटक करणे आवश्यक आहे.

===========================

आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी पोलिस प्रशासनाला तात्काळ दोषींना अटक करण्याची विनंती केली आहे. अन्यथा भद्रावती तालुका आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरुन न्यायासाठी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here