Home
Home चंद्रपूर *सिख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग...

*सिख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत*

0
103

==========================

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना फळांचे वाटप

===========================

सिख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त सिख समाज बांधवाच्या वतीने शहरातुन भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गंजवार्ड चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.

============================

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सतनाम सिंग मिरधा, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे,  अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष सलीम शेख, युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, नकुल वासमवार, देवा कुंटा, कार्तिक बोरेवार, विलास वनकर, किशोर बोल्लमवार, निकेश पेटकर, संजु बेरुगवार, आशु फुलझेले, दत्तु गवळी, मंगेश अहिरकर, गौरव जोरगेवार, करणसिंग बैस आदींची उपस्थिती होती.
पडोली येथील गुरुद्वारा गुरु तेज बहादुर येथील गुरुद्वारा जवळून सदर शोभायात्रेला सुरवात झाली. सदर शोभायात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर शोभायात्रा वरोरा नाका होत शहरात दाखल झाली. यावेळी या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गंजवार्ड येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना फळवाटप करण्यात आले.

==============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here