Home
Home चंद्रपूर *अमितने साकारले ऐतिहासिक शिवकालीन नाणी तथा तत्कालीन दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध...

*अमितने साकारले ऐतिहासिक शिवकालीन नाणी तथा तत्कालीन दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन*

0
112

========================

        * भद्रावती*

=========================

छंद वेड्या संग्राहक अमितने भद्रावती ऐतिहासिक नगरीचे नाव उंचावले.

=========================

बालपणापासूनच कुठला ना कुठला विषयासंदर्भात प्रत्येकाच्या जीवनात छंद असतो. आणि तो छंदच त्याचा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतो. त्या छंदासाठी वाटेल तो प्रयत्न … मनात चाललेल्या अनेक विषयासंदर्भात त्याची तळमळ स्वस्थ बसू देत नाही व त्यासाठी तो जीवाचे रान करतो . वेळप्रसंगी पराकाष्टा व जिद्द त्याच्या अंगात स्वयंनिर्मित अंगीकृत होते. व मग तो योग्य दिशेने वाटचाल करू लागतो .शेवटी तो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरूच असते व ती धडपडच इतरांनसाठी अभ्यासपूर्ण प्रेरणादायी ठरते. अशाच भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत किल्ला वार्ड येथे स्थित असलेलं गुंडावार बंधू कापड उद्योग व इतर क्षेत्रात प्रतिष्ठित परिवारात लहानाचा मोठा झालेला .शांत सुसभाव सर्वांना आपलंसं करीत संघटन शैलीत निपुण असलेला अमित मी जवळून बघितला आहे किल्ला परिसरातीलसंघाच्या शिस्तबद्ध तालमीत तयार झालेला अमित गुंडावार हा भद्रावतीत कुणासाठीच नव्हखा नाही व अपरिचितही नाही . सर्वांना दादा काकू मामा आजी या शब्दशैलीत आदराने बोलणारा. मित्र-मैत्रिणीत रमणारा विविध नाविन्यपूर्ण सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व इतर धार्मिक उत्सवात सातत्याने अग्रेसर असलेला अमित यांनी लहानपणापासूनच विविध इतिहासकालीन नाणी असो व राजा छत्रपती शिवकालीन, मुगल कालीन दैनंदिन जीवनात वापरत येणाऱ्या विविध वस्तू व मुद्रांकित साहित्य, लढाईत वापरात येणारे छोट्या-मोठ्या वस्तू असो अथवा स्टॅम्प असो किंवा विविध पोस्ट कार्ड त्यावरील विविध भाषेत इतिहास कालीन गिरवलेली बोल की जुन्या आठवणींना उजाळा देणारी अक्षरे असो की ,विविध पत्र साठा असो, तत्कालीन आर्थिक देवान घेवनातील धातू मधील मुद्रांकित नानी व त्याचबरोबर देशी- विदेशी नोटा नावीन्यपूर्ण सांस्कृतिक कलात्मक विविध इतर संग्रहित वस्तूचे जतन करण्याचा ध्यास गेली अनेक वर्षांपासून अमित गुंडावार यांनी छंद म्हणून आजतागायत व्यवस्थित पणे जोपासला आहे हे खूप महत्त्वाचे आहे. आतापर्यंत अनेक स्तरावर घेण्यात आलेल्या वस्तू संग्रहालय व कलाप्रदर्शनीत सदर वस्तू त्यांनी आतापर्यंत प्रदर्शित केल्या आहेत व त्याही पलीकडे जाऊन अजून त्यात भर घालून या छंदवेड्या अमित गुंडावार युवकाने एक उंच भरारी घेत भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत ऐतिहासिक नगरीत शिवकालीन नाणी तथा नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन लोकसेवा मंडळ भद्रावती चे संस्थापक कै. निळकंठराव गुंडावार जयंती समारोह दिनांक १९ जानेवारी ते २१जानेवारी २०२४ व्याख्यानमाले निमित्त आयोजित भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत लोकमान्य शाळेच्या वस्तुसंग्रहालय प्रदर्शन दालनात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याबरोबरच सर्वांसाठीच भव्य अभ्यासपूर्ण प्रदर्शनी साकारून भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीला शोभेल असं नावलौकिक केलं. हे खरोखरच भद्रावतीकरांनसाठी अभिमानास्पद बाब आहे.

============================

रवींद्र तिराणीक
संपर्क९८२२७२८९४०
संचालक कलाअकादमी चंद्रपूर
महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ
जनमंच सदस्य नागपूर

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here