*चंद्रपुर शहरात पुलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 01 देशी कटटा व 05 जीवंत काडतुस जप्त , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

0
16

===========================

*चंद्रपूर*

=============================

चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश मा.श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर मा. रिना जनंबधु अप्पर पोलीस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रपूर मा. महेश कोंडावार यांचा नेतृत्प्रत पथक अवैध रीत्या बाळगण्यावर माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राचवित होते. सदर मोहीमेदरम्याण पथकाला गोपनीय माहीती मिळाली कि,तुकुम तलाव, चंद्रपुर येथील के.जि.एन पान सेंटर जवळ एक इसम आपले कमरेला गावटी बनावठीचे रिवॉल्वर लावुन उभा आहे. सदर माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रवाना होवुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची तपासणी केली असता सदर ईसमाच्या कमरेला लागुन असलेल्या काळ्या बॅग मध्ये एक गावटी बनावठीचे रिवॉल्वर व त्यात वापरण्यात येणारे 05 नंग जीवंत काडतुस मिळुन आले. सदर ईसमास त्याचे नाव विचारून क्राईम रेकॉर्ड चेंक केले असता गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. सदर इसमाविरुध्द पोस्टे रामनगर येथे कलम 3,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन आरोपी नामे जुबेर साहेबअली शेख, वय 20 वर्ष, रा. लालपेठ कॉलरी नं.01,

============================

चंद्रपुर यांस पुढिल कायदेशीर कार्यवाहीकामी पोस्टे रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले.

============================

सदरची यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ संतोष येलपुलवार, पो.अ. गोपाल आतकुलवार यांनी केली.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here