*वे.को.ली मधील चोरी चा लोहा खरेदी करणाऱ्या भंगार व्यवसायीका वर जिला पुलिस अधिक्षकांची धड़क करवाई*

0
39

=========================

*भंगार चोर आणि खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकन मध्ये हड़कंप*

==========================

*चंद्रपूर*

==========================

पो.स्टे. चंद्रपुर शहर येथे फिर्यादी नामे प्रमोद जगन्नाथ वानखेडे, वय. ५१ वर्ष, धंदा. चौकीदार, रा. लालपेठ कॉलरी नं. १ चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर यांनी पोस्टे चंद्रपुर शहर येथे दि.०३/०२/२०२४ रोजी तक्रार दिली की, फिर्यादी हे नांदगाव पोळे येथील कोळसा खदानीवर अस्थाई स्वरूपात चौकीदारीचे काम करीत असुन दि.०२/०२/२०२४ रोजी ते दुपारी ३:०० वा. पासुन ते रात्रौ २३:०० वा. पावेतो डयुटी करूण आपले घरी गेले व दि.०३/०२/२०२४ रोजी सकाळी ०७:०० वा. आपले डयुडीवर हजर आले असता त्यांना मोकळया जागेत बंद स्थितीत असलेल्या मशीनचे भंगार मध्ये निघालेले १० ते १२ नग लोखंडी बेलन व इतर भंगार साहीत्य असा एकुण अं. किं.४८००/- रू चा माल दिसुन न आल्याने सदरचे लोखंडी बेलन व इतर भंगार साहीत्य कोणी तरी अज्ञात चोराने रात्रौ दरम्यान चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अप.क.३७९,४११,३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

==========================

सदर गुन्हयाचे तपासात मुखबीर कडुन खात्रीशिर खबर मिळाल्याने डि.बी. पथक स्टाफ सह मा. प्रभारी अधिकारी यांचे आदेशाने रवाना होउन, सदर गुन्हयात चोरीस गेलेले लोखंडी बेलन हे नांदगाव पोळे येथे असलेल्या अनील हजारे यांचे भंगार दुकानात असल्या बाबत माहीती मिळाल्याने सदर माहीतीची शाहानीशा करणे कामी पंच व पो.स्टाफ सह नांदगाव पोळ येथील अनील हजारे याचे भंगार दुकानात गेलो असता तेथे भंगार दुकानाची पाहणी केली असता दुकानात सदर गुन्हयात चोरीस गेलेले १२ नग लोखंडी बेलन अं. कि. ४८००/- रू वे मिळून आल्याने सदरचे लोखंडी बेलन हे गुन्हयाचे तपासात पुराव्या कामी दोन पंचा समक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करून नमुद भंगार दुकानदार नामे अनील बंडु हजारे, वय. ३५वर्ष, धंदा. भंगार दुकान, रा. नांदगाव पोळ यास ताब्यात घेवुन त्यास सदर माला बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा माल हा लालपेठ कॉलरी नं.३ येथील बादल कश्यप याने त्याचे दुकान विकला असल्याचे सांगीतल्याने नमुद अरोपीस ताब्यात घेवुन लालपेठ कॉलरी नं. ३ येथे जावुन बादल कश्यप याचा शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने नमुद अरोपीत इसमास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. व त्याचेकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले १२ नग लोखंडी बेलन अं. कि. ४८००/- रू वा माल जप्तक रण्यात आले.

============================

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर प्रभारी अधिकारी सपोनि रमीज मुलानी, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, पोउपनि. निंभोरकर, स. फौ. विलास निकोडे, पो.हवा. महेंद्र बेसरकर, पो.हवा. जयंता चुनारकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो.हवा. निलेश मुडे, म.पो.हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद यांनी केलेली आहे. सदर गुन्हयातील पुढील तपास पोहवा. महेंद्र बेसरकर करीत आहे.

==========================

*विशाल अरुण हजबन*

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here