Home
Home चंद्रपूर आ किशोर जोरगेवार यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या नव्या बसचे लोकार्पण

आ किशोर जोरगेवार यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या नव्या बसचे लोकार्पण

0
90

बसमधून प्रवास करत अनुभवल्या सुविधामहाकाली मंदिर येथे कार्यक्रम संपन्न 

                          चंद्रपूर 

                हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर, (का प्र):- सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा आज श्री माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर आ, किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर ते अंचलेश्वर गेट असा प्रवास करत बसमधील सुविधांचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाला एसटी महामंडळच्या जिल्हा विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खडीकर, वाहतूक अधीक्षक गोवर्धन, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बलराम डोडाणी, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, सुनील महाकाले, अमोल शेंडे, नकुल वासमवार, कुमार झुनमुलवार, कालिदास धामनगे, माजी नगर सेविका कल्पना बबुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

नव्या बसेसच्या आगमनामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या बसेस आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि सुविधाजनक होईल.

एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बसची पाहणी करत उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. तसेच महाकाली मंदिर ते अंचलेश्वर गेट बसस्थानकापर्यंत प्रत्यक्ष प्रवास केला.यावेळी महाकाली मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून बसचे लोकार्पण करण्यात आले.    ========================     *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =============================

*हॅलो चांदा न्यूज,                         मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                         *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here