Home
Home चंद्रपूर सरदार पटेल महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञानशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया...

सरदार पटेल महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञानशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया चं.महा.औ.वि.नि.केंद्र ला भेट.

0
157

HELLO CHANDA NEWS

         चंद्रपूर,(का. प्र.) : सरदार पटेल महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञानशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र B.Sc. प्रथम सत्रच्या विद्यार्थ्यांनी 27 मार्च 2026 रोजी चंद्रपूर सुपरथर्मल पॉवर प्लांट (CSTPS) येथील जलशुद्धीकरण केंद्र व सांडपाणी प्रक्रिया केंद्राला शैक्षणिक भेट दिली.

  या भेटीत सुमारे 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही भेट बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली होती.

           तसेच या भेटीचे आयोजन विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. वाढई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात CSTPS कॉलनीमधील सर्व सांडपाणी एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जाते व नंतर हे शुद्ध केलेले पाणी थर्मल पॉवर प्लांटमध्ये वापरले जाते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

 यावेळी वरिष्ठ कर्मचारी रामू वाघमारे तसेच केमिस्ट बी. जी. कामणकर यांनी मार्गदर्शन केले.

      तसेच जलशुद्धीकरण केंद्रात इरई धरणातून पाणी आणून ते एक दिवस साठवून ठेवले जाते व त्यानंतर त्यावर संपूर्ण प्रक्रिया करून ते पिण्यासाठी तसेच डीमिनरलाइज्ड वॉटर तयार करण्यासाठी वापरले जाते, याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रक्रियेबाबत केमिस्ट नितीन जामनानी यांनी मार्गदर्शन केले.

          या केंद्रातील तज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरणाची प्रक्रिया तसेच सांडपाण्याचे शुद्धीकरण कशा प्रकारे केले जाते याबाबत सविस्तर माहिती दिली.

               फिल्टरेशन, क्लोरीनेशन, डिसइन्फेक्शन तसेच सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या विविध जैविक व रासायनिक प्रक्रियांद्वारे पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर कसा केला जातो, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. ही माहिती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरली.

या शैक्षणिक भेटीदरम्यान प्रा. वैष्णवी हलकारे व प्रा. हर्षदा बावरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी या भेटीतून प्रत्यक्ष ज्ञान आत्मसात करत औद्योगिक पातळीवरील जल व सांडपाणी व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.

उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरविंद सावकार पोरेड्डीवार, ,  कार्यकारी अध्यक्ष किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष श्रीमती सगुणा तलांडी सचिव प्रशांत पोटदुखे,  सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, कोशाध्यक्ष संदीप गड्डमवार व सन्माननीय सदस्य राकेश पटेल,  जीनेश पटेल एस. रमजान, सुरेश पोटदुखे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, विभागातील इतर प्राध्यापक वृद यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here