HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
शांतता समितीची ही बैठक दिनांक 14 एप्रिल 2026 आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संबंधाने दिनांक 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता घेण्यात आली.
या बैठकीत 14 एप्रिल 2026 आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम शांततेत संपन्न झाले पाहिजे, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा या करिता ही बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत आवश्यक सूचना व निर्देश रामनगरचे पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा शांतता समिती सदस्य सदानंद खत्री, जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, जिल्हा शांतता समिती सदस्य अंजली घोटेकर, जिल्हा शांतता समिती सदस्य शालिनी भगत,जिल्हा शांतता समिती सदस्य पीयूष मेश्राम, रामनगर पोलिस स्टेशन शांतता समिती सदस्य ताजुद्दीन शेख, रामनगर पोलिस स्टेशन शांतता समिती सदस्य गुलाबराव पाटील, रामनगर पोलिस स्टेशन शांतता समिती सदस्य भरती अजय दुदानी, सह विशेष शाखेचे राजू अर्वेलीवार, राजू चिताडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

























