Home
Home चंद्रपूर महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आ. किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन..

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आ. किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन..

0
84

HELLO CHANDA NEWS

 चंद्रपूर,(का. प्र.) : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज चंद्रपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

  यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर माजी अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रवी गुरुनुले, तुषार सोम, बलराम डोडाणी, डॉ. संजय घाटे, राहुल मोहुरले, महेश कुलटे, अॅड. रेनगुडे, रवी बनकर, प्रलय मशाखेत्री आदींची उपस्थिती होती.

  यावेळी आमदार जोरगेवार यांनी महात्मा फुले यांनी दिलेले शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

           त्यांच्या शिकवणीमुळे समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून, वंचित आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि सामाजिक समतेसाठी केलेले कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

  उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 या वेळी मोठ्या संख्येने समाजबांधव, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here