Home
Home चंद्रपूर संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला – आ. किशोर जोरगेवार.

संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला – आ. किशोर जोरगेवार.

0
70

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर,(का. प्र.) : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून, भारतीय संगीतविश्वासाठी ही एक अपूरणीय हानी आहे. आपल्या विलक्षण, मधुर आवाजाच्या जोरावर त्यांनी अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

  त्यांच्या गायकीने केवळ हिंदीच नव्हे, तर विविध भारतीय भाषांतील संगीताला समृद्ध केले आणि भारतीय संस्कृतीचा गोडवा जगभर पोहोचवला. त्यांच्या जाण्याने आज अजरामर सुरांचा प्रवास आणि संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.

           आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गात संगीतसृष्टीला अनमोल ठेवा दिला. त्यांच्या प्रत्येक गाण्यात भाव, अभिव्यक्ती आणि सुरेलपणाची अद्वितीय सांगड दिसून येत असे.

  शास्त्रीय, सुगम, गझल, लोकसंगीत, चित्रपटसंगीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, लयबद्धता आणि भावनिक ताकद यामुळे त्यांच्या गीतांना आजही तितकीच लोकप्रियता आहे.

                    त्यांच्या गायकीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असून, नवोदित कलाकारांसाठी त्या सदैव आदर्श राहिल्या आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ महानच नव्हे, तर अजरामर आहे.

       त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि श्री माता महाकाली त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशातून केली आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here