Home
Home चंद्रपूर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे हेच उद्दिष्ट,आमदार अभिजित वंजारी. कर्तव्यपूर्ती सोहळ्यात शाळांना...

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे हेच उद्दिष्ट,आमदार अभिजित वंजारी. कर्तव्यपूर्ती सोहळ्यात शाळांना संगणक व ग्रंथालयांना पुस्तकांचे वाटप.

0
35

HELLO CHANDA NEWS

       चंद्रपूर, (का. प्र.) : विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणप्रणालीशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले.

  त्यांच्या आमदार निधीतून आयोजित संगणक वाटप व कर्तव्यपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवार, ७ मे रोजी जिल्हा नियोजन भवन, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.

 कार्यक्रमाला आमदार अभिजित वंजारी, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा नियोजन अधिकारी कुमरे, मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूरचे अध्यक्ष सुनील शेरकी, कार्यवाहक दीपक धोपटे, महानगर कार्यवाहक सुरेंद्र अडबाले, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, सतीश बावणे, नगरसेवक राहुल घोटेकर, नंदकिशोर धानोरकर, अजय अलगमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

     यावेळी बोलताना आमदार वंजारी यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड मिळणे अत्यावश्यक आहे.

               ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये डिजिटल सुविधा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे.

      तसेच ग्रंथालयांमध्ये अद्ययावत व ज्ञानवर्धक पुस्तकांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यावर भर दिला जात आहे.

    कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध शाळांना संगणक संचांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रंथालयांना शैक्षणिक, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि ज्ञानवर्धक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक साधनांचा प्रत्यक्ष वापर करता येणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.

   यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनीही आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून आपले भविष्य घडवावे, असे आवाहन केले.

        कार्यक्रमास शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक, ग्रंथालय संचालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*                     *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069* *बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻*Gmail 📨⬆️⏬**shashithakkar2409@gmail.com*  *9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here