HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(का. प्र.) शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेले महाराणा प्रताप तसेच विश्वकवी, तत्त्वज्ञ आणि महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे भाजपा महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मेवाडच्या स्वाभिमानासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी परकीय सत्तेसमोर कधीही शरणागती पत्करली नाही.
हल्दीघाटीच्या युद्धातील त्यांचे धैर्य आणि राष्ट्राभिमान आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांचे जीवन हे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा आदर्श मानले जाते.
तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय साहित्य, कला, शिक्षण आणि सामाजिक विचारविश्वाला नवी दिशा दिली.
“गीतांजली” या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. भारताचे राष्ट्रगीत “जन गण मन” आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत “आमार सोनार बांगला” यांची निर्मिती त्यांनी केली. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम असावे, या विचारातून त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली.
त्यांच्या साहित्य आणि विचारांमधून मानवता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक समतेचा संदेश दिला गेला.
यावेळी दोन्हीही महान व्यक्तींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रपूर महानगर महामंत्री मनोज पाल, श्याम कणकम, सविता दंडारे, विधानसभा प्रमुख दशरथ सिंग ठाकूर, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, सारिका संदूरकर, महिला मोर्चा महामंत्री सायली तोंडरे, युवा मोर्चा महामंत्री सतीश तायडे, किसान आघाडी अध्यक्ष संजय बुरघाटे, बीएलआय प्रमुख सुमित बेले, अजय जैस्वाल, डॉ. अमल पोद्दार, अनु. जाती अध्यक्षा विमल कातकर, तेलगू आघाडी अध्यक्ष ओमेश आयलू, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षा कौसर खान, विश्वजित शहा, मंडळ महामंत्री राकेश नाकाडे, कार्तिक बोरेवार, राकेश बोम्मावार, चंदन पाल, अनुराधा हाजरा, हरमन जोसेफ, नूतन मेश्राम, तापोश डे, रंजन ठाकूर, शालू कन्नोजवार, बबलू मेश्राम, कल्पना शिंदे, आकाश लडके, रीना साखरकर, सोनू शुक्ला, राधेश्याम बाजपाई, मनीषा पडगेलवार, अंजु तोडे, साई कोटा, प्रशांत द्विवेदी, रिता रॉय, निभा सरकार, निलेश्वरी पटले, माया रॉय यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.























