Home
Home चंद्रपूर *वरोऱ्यात स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय महोत्सव उत्साहात साजरा*

*वरोऱ्यात स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय महोत्सव उत्साहात साजरा*

0
80

================================  

वरोरा*             =============================
 *वरोरा येथे 77व्या स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.*  ==============================
वरोरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.     ==========================                      तहसील कार्यालय आणि शहिद योगेश डाहुले स्मारक परिसरातील 75 फूट मनोरम्यावर ध्वजारोहन  उपविभागीय अधिकारी शिवनंदा   लंगडापुरे यांचे हस्ते पार पडले. नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी गजानन भोयर यांचे हस्ते ध्वजारोहन पार पडले. आनंद निकेतन महाविद्यालय चे प्रांगणात महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांचे हस्ते ध्वजारोहन पार पडले. स्वातंत्र्य दिनी डॉ. विकास आमटे यांनी थोर समाजसेवक श्रद्देय बाबा आमटे यांच्या समाजसेवेतून कृष्ठ रुग्णांना एक नवीन जीवन मिळाले आहे.बाबांच्या अनेक संघर्षमयी जीवनातून त्यांच्या यशस्वीतेवर आपल्या विचारातून प्रकाश टाकला.
आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे मुख्याध्यापिका विद्या गोखरे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.. हिरालाल लोया विद्यालय व, ज्युनियर कॉलेज मध्ये ध्वजारोहन भारत शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकांत लोया यांचे हस्ते पार पडले.

   स्वातंत्रदिनी संविधानाचे अभ्यासक ऍड. विनोद खोब्रागडे यांनी मार्गदर्शनात बोलताना म्हटले की,77वर्षांपूर्वी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 15 आगस्ट ला स्वातंत्र मिळाल्यानंतर 16 आगस्ट ला. मंत्रालयात मोर्चा काढला होता. आजादी झूठी है, देश की जनता भुकी है, या देशामध्ये जातीप्रथा आहे.6700 जातीमध्ये समाज विभागल्या गेला आहे. स्वातंत्र मिळाले जनता आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षेत होते. परंतु भारत सरकारने खाजगीकरण सुरु केल्याने सामाजिक संस्था उध्वस्त झाल्या असल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. युवा वर्गाला नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. असे मत खोब्रागडे यांनी व्यक्त केले.  ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here