*कोरपना घटनेतील आरोपीला बदलापूर घटनेतील आरोपीप्रमाणे शिक्षा देण्‍यात यावी – विशाल निंबाळकर*

0
14

=================================

*भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा,अध्‍यक्ष शिक्षक अमोल लोडे विरोधात तिव्र आंदोलन*

चंद्रपूर जिल्‍हयातील कोरपना तालुका येथील इमिनेन्‍स इंटरनॅशनल स्‍कुल या शाळेत शिकणा-या १२ वर्षीय विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्‍यक्ष शिक्षक अमोल लोडे याने माणुसकीला काळीमा फासणारे निच कृत्‍य केले. या विरोधात विद्यार्थीनीला न्‍याय मिळावा याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे जाहीर निषेध करत तिव्र आंदोलन करण्‍यात आले.                                 

दिनांक ३ ऑक्‍टोंबर २०२४ रोजी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्‍हा यांच्‍या सुचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे जाहीर निषेध करीत तिव्र आंदोलन करण्‍यात आले. यावेळी कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्‍यक्ष शिक्षक अमोल लोडे याच्‍या पुतळयाला काळे फासुन चप्‍पल जोडे मारून पुतळयाचे दहन करण्‍यात आले. देशातील मुली व महिला सुरक्षीत राहाव्‍यात याकरिता कायमच भारतीय जनता पार्टी कार्यरत असून अश्‍या प्रकारचे निच कृत्‍य करणा-यांविरोधात कायमच पुढे आहे.                                                                                         या आंदोलनामध्‍ये चंद्रपूर महानगर भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांनी बदलापूर घटनेतील आरोपीला ज्‍या पध्‍दतीने शिक्षा देण्‍यात आली त्‍याचप्रमाणे अमोल लोडे याला देखील शिक्षा देण्‍यात यावी, अशी मागणी महाराष्‍ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली आहे. यावेळी आंदोलनात चंद्रपूर महानगर भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांच्‍यासह महामंत्री गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, यश बांगडे, पप्पू बोपचे, सुनील डोंगरे, आदिवासी आघाडी युवती प्रमुख तृष्‍णा गेडाम, राकेश बोमनवार, अमित निरंजने, कुणाल गुंडावार, पराग मलोडे,  पवन ढवळे, मनीष पिपरे, पार्थ कंचर्लावार,  प्रवीण उरकुडे, स्नेहीत लांजेवार, दर्शन बेले, राहुल पाल, रोशन खोब्रागडे, मयूर चहारे, हर्ष पोपट, राहुल कांबळे, गजानन भोयर, रघु गुंडला, आकाश लकाकुल्ला, योगेश अंड्रस्कर, गणेश बानकर, आतिश हटवाल, स्वप्नील भोपये, अमन मुंदडा, तेजस अलवलवार, यश ठाकरे, शुभम निंबाळकर, हेमंत सिंघवी, मोहन मंचलवार, ऐश्वर्य बांगडे, हिमांशू पन्नासे, दीपक हूड, मनोज उगेमुगे, कुणाल आंबेकर, सौरभ मेश्राम, सागर गटलेवार, मुकेश देशपांडे, स्‍वप्‍नील निंबाळकर, आकाश मालेकर युवा मोर्चाचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.     =================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here