=================================
*मा. ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांच्या
*सुचनेप्रमाणे*
*डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या पुढाकारातून*
*भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी मध्यस्थीने संपाची यशस्वी सांगता*
*कामगारांच्या सन्मार्थ सुधीर भाऊंचे नेहमी पालकत्व : डॉ. मंगेश गुलवाडे*
—————————————–
चंद्रपूर,
02 ऑक्टोबर 2024: धारिवाल कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा मागील 24 सप्टेंबरपासून सुरू असलेला संप यशस्वीरीत्या संपला आहे. भारतीय जनता पक्षाच्या हस्तक्षेपाने आणि डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या अजातशत्रू व्यक्तिमहत्वामुळे व विशाल निंबाळकर तसेच
भारतीय मजदूर संघाचे हेमराज गेडे साहेब,
राकेश बोमनवार,प्रवीण उरकुडे,
अमित निरंजने, पवन ढवळे, रामकुमार आकापल्लीवार यांच्या प्रभावी वाटाघाटींमुळे कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यांच्या पगारात 13 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामगारांच्या संपामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती सोडवण्यासाठी मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश गुलवाडे आणि विशाल निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे धारिवाल कंपनीचे व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगारांमध्ये समन्वय साधण्यात आला व कामगारांनी आपला संप मागे घेतला.
संप मिटल्याने धारिवाल कंपनीच्या कामकाजात नियमितपणा परत आला असून, सर्व कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शंकर खंडारकर,सुरज गादेवार आणि विशाल मेश्राम या कामगार प्रतिनिधींनी मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि वाटाघाटी करणाऱ्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.
या यशस्वी मध्यस्थीमुळे धारिवाल कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होईल व त्यांचे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होणार आहे . ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,