Home
Home चंद्रपूर बातमी प्रकाशित केल्यानंतर कोणीही खंडणी मागणार का?अशरफ मिस्त्री यांचा सवाल!*

बातमी प्रकाशित केल्यानंतर कोणीही खंडणी मागणार का?अशरफ मिस्त्री यांचा सवाल!*

0
83

===============================

आता पुढे पुढे पाहू होणार तरी काय? या प्रकरणातील संबंधित शोधणार कोण कोणते उपाय!

चंद्रपूर(जि.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे एका व्यापाऱ्याकडून ज्येष्ठ पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी दहा लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार पोलीस स्टेशन मुल येथे केली आहे याबाबत ज्येष्ठ पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी सांगितले की कोणताही पत्रकार बातमी प्रकाशित करून खंडणी मागणार का? त्यांच्याकडून करण्यात आलेला हा प्रश्न अत्यंत विचारणीय असून बातमी प्रकाशित झाल्यावर पत्रकार खंडणी कशी मागणार असे शक्य नाही असे देखील बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे, हे मात्र विशेष!

तळ हाताने सूर्यप्रकाश झाकता येत नाही त्यामुळे सत्य समोर आलं की त्रास होतोच. ज्येष्ठ पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध अनेक बातम्या प्रकाशित केले आहे व ते सत्य उघडकीस आणण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात व मागील अनेक वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे व त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिलेले आहेत, व त्यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेक मोठे मोठे गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले आहे, हे मात्र विशेष!

आता नुकतेच कोंतमवार नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मुल येथे दहा लाख रुपये खंडणी मागितल्याची तक्रार केली असल्याची माहिती मिळालीआहे. वास्तविक पाहता काही दिवसापूर्वी त्यांनी त्याच्या विरोधात ब्लॉगच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली व ही बातमी प्रकाशित झाल्याने कोंतमवार यांनी पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी दहा लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दाखल केली आहे वास्तविक पाहता हे शक्य आहे का? कारण की बातमी प्रकाशित झाल्यानंतर कोणत्याही पत्रकारांनी अजून पर्यंत खंडणीची मागणी केल्याचे आमच्या कानावर तरी आले नाही! हे कितपत सत्य आहे याची सखोल अशी चौकशी झालीच पाहिजे.
कोंतमवार यांनी पोलीस स्टेशन मुल येथे केलेल्या तक्रारीच्या संदर्भात अशरफ मिस्त्री यांना विचारले असता त्यांनी सांगितले की बातमी प्रकाशित केल्यानंतर मी खंडणीची मागणी कशी करणार? हा माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा असून दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या विरोधात मी अनेक वेळा बातम्या प्रकाशित केले आहे व कोंतमवार यांच्या संदर्भात ही मी पूर्वीच बातमी प्रकाशित केली आहे असे त्यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी असेही सांगितले की मी घरी हजर असताना माझ्या संदर्भात मी फरार असल्याचे प्रेस नोट का काढण्यात आले हे समजून येण्यासारखे नाही तसेच मी नेहमी दोन नंबरचे धंदे करणाऱ्या विरुद्ध बातम्या प्रकाशित करत आहोत त्यामुळे माझ्यावर हा कट कारस्थान रचण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या गर्तेत असलेल्या अवैध वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आता अशरफ मिस्त्रीच्या निर्भिक लिखाणामुळे त्रास होतोय. असे देखील बोलले जात एवढेच नव्हे तर अशी ही माहिती मिळाली आहे की आपली पोल उघड होत असल्याचं लक्षात आल्यावर, गुरुवारी या व्यापाऱ्याने मूल येथील एका बारजवळ मूलमधील सर्व अवैध धंदेवाल्यांना बोलावलं. हे सर्व प्रतिबंधित घातक गुटखा विकणारे, नकली मिठी सुपारी, माजा, अवैध दारू, जुगार अड्डे, सट्टेबाज, सेक्स रॅकेटशी संबंधित चेहरे आहेत. सूत्रांकडून कळते की एक व्यापारी समोर दिसतोय, परंतु वास्तविकपणे हे सर्व एका वर्दिधारी व्यक्तीचं काम आहे, व तोच ‘मास्टरमाइंड’
असल्याचे माहिती सूत्राद्वारे मिळाली आहे.

खरं तर, या व्यापाऱ्याच्या तळमळीनंतर ‘लूट’ ची एक वेगळीच कहाणी आहे. शेतात मकड्याच्या जाळ्यासारखे पसरलेले वीजेचे तार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपले हात ‘गर्म’ करून, कोणताही डिमांड त्या शेतमालकाकडून भरून न घेता,पैसे न घेता, महावितरणच्या तिजोरीला चूना लावून शेतातील वीजेचे तार काढून टाकले आहेत. अशी ही माहिती कानावर आली आहे व आता त्या शेतात फक्त वीजेचे खांब उभे आहेत आणि याच प्रकरणात खरा खेळ लपलेला आहे. असे देखील बोलले जात आहे.

ग्रीन बेल्टमध्ये ‘खेल’..!
पूर्वी हे शेत दुसऱ्या मालकाचे होते, परंतु एका व्यापाऱ्याने ते खरेदी केले. आता या शेताच्या काही भागावर दुसऱ्या व्यक्तीचं नाव नोंदवण्यात आले आहे. आधी हे शेत ग्रीन बेल्टमध्ये होते, परंतु त्या व्यापाऱ्याने काही युक्त्या करून पूर्व नगरपरिषदेच्या प्रशासकांच्या मदतीने शेताला ग्रीन बेल्टमधून येलो बेल्टमध्ये बदलून टाकले आहे. म्हणजे शेताच्या जमिनीचा वापर निवासी जागेसाठी करण्याचा फेरफार पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने झाला. असे देखील बोलले जात आहे. ग्रीन बेल्टमधून येलो बेल्टमध्ये बदलण्यासाठी मोठी रक्कम घेतली गेली. याबाबत पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी बातमी ही प्रकाशित केली होती, हे मात्र विशेष!

महावितरणला ३३ कोटींचा चूना..!
महावितरणच्या मूल उपशाखेच्या अधिकाऱ्यांनी शेतमालकाकडून वीजेच्या तारा काढण्यासाठी डिमांड भरून घेतला नाही, त्यामुळे त्यांचा लाखोंचा खर्च वाचला. परंतु, अधिकाऱ्यांनी आपला खिसा गरम करून महावितरणला मोठा तोटा केला. अशी चर्चा सर्वत्र होत आहे. यासंदर्भात मूल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी अशरफ मिस्त्री यांनी विचारले असता त्या संबंधित अधिकाऱ्यांनी चंद्रपूरच्या कार्यकारी अभियंत्याकडे बोट दाखवून, त्यांच्या आदेशावरूनच वीजेचे तारे काढले असल्याचे सांगितले. या प्रकरणाचीही गंभीरपणे चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे. सत्य पूर्णपणे उघडकीस आलेच पाहिजे असे बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जात आहे.

एक व्यापारी पूर्वीपासूनच गुन्ह्यांमध्ये सहभागी राहिला आहे. २०१० साली मूलमधील एका प्रकरणात ब्लॅकमेलिंग करून लाखोंची लाच मागण्याच्या प्रकरणात त्याला अटक ही झाली होती. अशी बातमी तेव्हा प्रकाशित झाली होती तसेच, शासकीय धान खरेदी प्रकरणातही त्याचं नाव चर्चेत आलं होतं.असं ही सांगितलं जातं की या प्रकरणातही मंत्रालयातील थांबलेलं ३३ कोटींचं बिल त्याने राजकीय तिकडम लावून मिळवले हे कितपत सत्य आहे याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.

पत्रकाराच्या विरोधात खोटा अहवाल..!
अवैध धंदे करणारे संबंधित लोकांच्या या गुप्त बैठकीचा उद्देश फक्त आपला दरारा कायम रहावा व आपल्या विरुद्ध कोणीही आवाज उठवू नये किंवा आपल्या विरोधात कोणतेही लिखाण करू नये यासाठी सर्व अवैध धंदे करणाऱ्यांनी एकत्र होऊन केलेला हा प्रकार असल्याचे गुप्त सूत्रानुसार कळले आहे.

स्वतःला चौकशी पासून वाचविण्यासाठी पत्रकार अशरफ मिस्त्री यांच्या विरोधात खोटी तक्रार देण्यात आल्याची माहिती स्वतः ज्येष्ठ पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी दिली आहे.

सर्व अवैध धंदे करणारे अशरफ मिस्त्री यांनी केलेल्या लिखाणामुळे संतापलेले आहेत. व त्यांच्या विरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यामुळे त्या सर्वांनीच एकत्रित येऊन हा डाव खेळला असावा असे देखील बोलले जात आहे.

ऑनलाइन पोर्टलपासून ते दैनिक आणि साप्ताहिकांमध्ये वेळोवेळी त्यांचा लिखाणामुळे भांडाफोड झाला आहे. व दोन नंबरचे धंदे करणारे नेहमीच त्यांच्या निशाण्यावर असतात. त्यामुळे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांच्या मनात त्यांना अद्दल घडावी याकरिता हा सर्व प्रकार घडला असावा अशी ही शंका व्यक्त केली जात आहे.

पत्रकाराच्या विरोधात खोटा अहवाल तयार करण्याची ही योजना आखली गेली आहे, आणि हे संपूर्ण काम एका पोलिस अधिकाऱ्याच्या सूचनेने व मदतीने केले जात आहे. असे देखील अशरफ मिस्त्री यांचे म्हणणे आहे. तसेच
महावितरणच्या वीजेच्या तारा नियमबाह्य पद्धतीने काढून टाकल्याच्या प्रकरणात आणि ग्रीन बेल्टच्या शेतात फेरफार करून ते येलो बेल्टमध्ये बदलल्याच्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. हे प्रकरण महाराष्ट्र शासनाने गंभीरतेने घेतले पाहिजे आणि पत्रकाराला धमकावण्याचे असे प्रकार थांबवले पाहिजेत अशी मागणी जेष्ठ पत्रकार अशरफ मिस्त्री यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने सखोल अशी चौकशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केली जाणार का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

आता पुढे पुढे पाहू होणार तरी काय? या प्रकरणातील संबंधित शोधणार कोण कोणते उपाय!     =================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     =================================      कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here