Home
Home प्रशासकीय *माझ्यासाठी विभागातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा सदस्य: रवींद्रसिंह परदेशी.*

*माझ्यासाठी विभागातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा सदस्य: रवींद्रसिंह परदेशी.*

0
154

================================

*माझ्यासाठी विभागातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा सदस्य: रवींद्रसिंह परदेशी.*

परभणी(वि.प्र.): अधिकारी येतात आणि जातात काही दिवस लोक त्यांचे नाव घेतात व नंतर ते गेल्यावर त्यांचे नाव विसरतात परंतु काही काही असे अधिकारी असतात जे बदली होऊन दुसऱ्या ठिकाणी गेल्यावरही त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या कामाचे कौतुक केले जाते. अशाच एक अधिकारी चे नाव व त्यांची कार्यप्रणाली व आपल्या खात्यातील लोकांशी आपुलकीचे संबंध ठेवून आपलाच माणूस म्हणून माणुसकीचा नाता जपण्याची वेगळीच शैली असते अशा मोठ्या अधिकाऱ्याचा नाव सदैव कायम असतो. सर्वांसोबत समानतेची वागणूक हीच त्या व्यक्तीची विशेष ओळख असते अशाच एका अधिकाऱ्याची चर्चा आता परभणीत ही होऊ लागली आहे हा व्यक्ती कोण ही सांगण्याची गरज जरी नसली तरी ते अधिकारी म्हणजे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी होय कारण की त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक चा कार्यभार उत्तमरीत्या सांभाळत आपल्या विभागात नावलौकिक केले होते, हे मात्र विशेष!                    कर्मचारी असो किंवा त्यांच्या अंतर्गत काम करणारे अधिकारी असो ते सर्व आजही रवींद्रसिंह परदेशी यांचे नाव विसरले नाही हे मोठे अभिमानाने सांगावे लागेल.                                        काम करण्याची इच्छाशक्ती निर्धार आणि समयसूचकता हीच यशाची त्रिसूत्री आहे असे म्हटले जाते तर याच ब्रीदवाक्य प्रमाणे रवींद्रसिंह परदेशी यांची कार्यशाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही! कारण की पोलीस खात्यात त्यांनी आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे व त्यांची निर्णय घेण्याची क्षमता व वागणुकीबद्दल जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जिथे त्यांनी सेवा दिलेली आहे त्यांच्या नावाची चर्चा सतत होत असते.                                          परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे अजूनही पुन्हा एकदा सामान्य नागरिकांतून तसेच पोलीस खात्यातून कौतुक केले जात आहे, याचे कारण असे की परभणी येथील पोलीस खात्यात ए एस आय म्हणून कार्यरत शब्बीर खान पठाण यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी 16 जानेवारी 2025 रोजी रात्री नऊ वाजता नवरदेव मोहसीन खान यांना तसेच त्यांचा वधूला मंचावर जाऊन भेट देत सुखी आयुष्य जगण्याचे आशीर्वाद ही दिले! त्यामुळे शब्बीर खान यांचे कुटुंबातील नातेवाईक तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे डोळे पाणावले होते, हे मात्र विशेष! कारण की एवढा मोठा अधिकारी परंतु तीळमात्र ही अभिमान नाही याची प्रचिती उपस्थित सर्वांना आल्याने अधिकारी असावा तर असा असे स्पष्टपणे बोलले जात होते.                                        मोहसिन खान यांचे वडील शब्बीर खान तर परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आपल्या या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित झाल्यामुळे अक्षरश: भारावून गेले होते. त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे स्वागत सत्कार केले. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी शब्बीर खान व सर्व कुटुंबीयांना सुद्धा शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शब्बीर खान यांनी भाऊक होऊन सांगितले की आता तर माझी नोकरी खरोखरच सार्थक ठरली! आपल्यासारखा मोठा अधिकारी माझ्या कार्यक्रमात उपस्थित झाल्याने मी आपला आभारी आहे असेही त्यांनी सांगितले असता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले की माझ्या विभागातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे असे नम्रपणे सांगत उपस्थित मान्यवरांशी संवाद साधून त्यांनी तिथून निरोप घेतला.                         पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तेथून निघून गेल्यावर मात्र त्यांनी काढलेल्या उद्गाराचे फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात होते, व आज आम्ही प्रत्यक्ष माणुसकीचा झरा ज्याच्यात वाहत असतो असा अधिकारितला माणूस पाहिला आहे, असे स्पष्टपणे कार्यक्रमाला उपस्थित सर्वसाधारण माणसांकडूनही बोलले जात होते व हीच त्यांची कार्याची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!                  कारण की माणसाला माणूस समजून कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपले कर्तव्य पूर्ण करून समोरची वाटचाल करीत जो व्यक्ती सहज निघून जातो अशा उमद्या अधिकारीच्या कार्याला सलाम! असे देखील बोलले जात होते, हे मात्र विशेष!

पुन्हा एक प्रसंग लक्षात आला ते म्हणजे रवींद्रसिंह परदेशी यांच्या वाढदिवसा प्रसंगी पोलीस विभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरात परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह रक्तदान केले होते व त्यामुळे सुद्धा त्यांचे परभणीत माणसातला माणूस म्हणून कौतुक करण्यात आले होते, हे मात्र विशेष!

परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या कार्यक्रमात वर – वधूला शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगी कलम मांगे इन्साफ चे मुख्य संपादक सय्यद रमजान अली, मीडियाचे इस्माईल भाई, जाकिर पठाण, सह अनेक मान्यवर बहुसंख्येने हजर होते. सर्वांशी वागणूक समान! त्यांच्या या कार्यशैलीचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले हे मात्र विशेष!,           ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ===============================            कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे *मुख्य संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356* *उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here