Home
Home चंद्रपूर *जिवती तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे,श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास*

*जिवती तालुक्याच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे,श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास*

0
76

=================================

*जिवती येथील माता जंगोदेवी यांच्या यात्रेनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला उपस्थिती* 

  *जिवती*

*जिवती*(का, प्र,) तालुक्याने जेव्हा जेव्हा विकासकामांसाठी हाक दिली, तेव्हा तेव्ही मी खंबीरपणे पाठिशी उभा राहिलो आहे. आताही अनेक मागण्या आल्या आहेत. त्यांचा सकारात्मक विचार करून तालुक्याच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी सदैव तत्पर आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.जिवती येथील माता जंगोदेवी देवस्थानात पौष महिन्यातील यात्रेनिमित्त आयोजीत कार्यक्रमाला आ. श्री. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. माता जंगोदेवीचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आदिवासी चळवळीचे नेते जगन येलके, गणेश परचाके, विवेक बोढे, नामदेव डाहुले, हरीश ढवस, अजित मंगळगिरीवार, राहूल संतोषवार, विनोद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.आमदार मुनगंटीवार म्हणाले, ‘या स्थानावर येणारी व्यक्ती ऊर्जा आणि शक्ती घेऊन जात असते. माझी जंगो आईला एवढीच प्रार्थना आहे की, निवडणूक जिंकणे हे आमचे अंतिम ध्येय नसून आम्हा सर्वांना गोरगरिबांची, आदिवासी, ओबीसी, अनुसुचित जातींमधील बांधवांची मने जिंकण्याचा आशीर्वाद हवा आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची शक्ती हवी आहे.’‘आदिवासी बांधवांनी आम्हाला खूप प्रेम दिले. भरभरून आशीर्वाद दिलेत. म्हणूनच आमदार म्हणून याठिकाणी दर्शनाला आलो आहे. पौष महिन्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. दरवर्षी याठिकाणी श्रद्धा आणि भक्तीभावाने जात-पात न बघता अनेक लोक येतात आणि इथून जाताना ऊर्जा, शक्ती, आशीर्वाद घेऊन जातात, याचा मनापासून आनंद वाटतो. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन माझे स्वागत केले आणि मला खूप प्रेम दिले, त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे,’ या शब्दांत आ. श्री. मुनगंटीवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.     ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ===============================           

*हॅलो चांदा न्यूज,मुख्य संपादक,शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here