==============================
*चंद्रपूर*
=========================
हॅलो चांदा न्युज ====================
चंद्रपूर, (का प्र ),योग नृत्य परिवार 8 च्या बॅच च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करत योग नृत्य परीवार च्या वतीने शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या* !🚩🚩💐सुरवातीला जेष्ठ सदस्या तडस काकू यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली.
यानंतर मुग्धा खांडे, कोटकर गुरुजी , प्रकाश गुंटेवार, अशोक उईके, गीतेश गावंडे,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अमित अडेट्टीवार यांनी शिवगर्जना सादर केली
संचालन धनंजय तावाडे यांनी केले
सर्वांना अजय भाऊ कोतपल्लीवर यांच्या तर्फे नाष्टा व चहा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात,आली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जयश्री सागोळे, रामभाऊ वाकुडकर, शंकर आसुटकर आणि इतर सदस्यांनी अथक परिश्रम घेतले ========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =======================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356