===============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर(का.प्र.): जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा चंद्रपूर चे प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात पत्रकार परिषदेचे आयोजन जनपद सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे केले होते.
या पत्रकार परिषदेत जिल्हयातील 49989 हजार लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजुरी ला गती मिळणार असे सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री ना. अमीत शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी ग्राम विकास मंत्री जय कुमार गोरे व योगेश कदम राज्य मंत्री ग्राम विकास विभाग यांचे हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, टप्पा 2 अंतर्गत 22 फेब्रवारी 2025 ला दृकश्राव्य पध्दतीने 20 लाख
घरकुल लाभार्थाना मंजुरी पत्र व 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली असून
या कार्यक्रमा दरम्यान चंद्रपुर जिल्हयातील 49989 घरकुल लाभार्थीना मंजुरी आदेश पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चंद्रपुर जिल्हयातील सर्व तालुके व ग्राम पंचायत स्तरावर एकाच वेळी होणार असुन, जिल्हा स्तरावर चंद्रपुर येथुन होणा-या भव्य दिव्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण “4.15 वा. व संध्याकाळी 6.00 वा. घरकुलाच्या लाभार्थ्यांना प्रमाण पत्राचे वाटप प्रिर्यदर्शिनी” इंदीरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे आदीवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपुर ना.डॉ. अशोकजी उईके यांचे अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.
यामध्ये कार्यक्रमातील चंद्रपुर जिल्हयातील लाभार्थ्यांना 49989 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात येणार आहे, यापैकी 14403 लाभार्थ्यांना यापुर्वीच पहिल्या हप्त्याचे वितरण केले असुन, या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते 35586 लाभार्थ्यांना पहिला हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
यासोबतच लाभार्थ्यांना आणखी तीन लाभ मिळणार!
1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार हमी योजनेतुन 90 दिवसाच्या मजुरीचा लाभ देण्यात येणार आहे.
2. यापुर्वी ज्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला नाही, अशा घरकुल धारकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे.
3. पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेतुन 1 लाख रुपये जागा खरेदीसाठी देण्यात येणार आहे.
या दिवशी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार असुन, त्यामध्ये ग्राम पंचायत स्तरावरील मान्यवरांचे हस्ते मंजुर लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश वितरण तसेच घरकुल योजना बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असुन, त्यामध्ये जिल्हयातील वरोरा, राजुरा, चिमुर व मुल या तालुक्यामध्ये तसेच मिंडाळा तालुका नागभिड, मोरवा तालुका चंद्रपुर, चिंतलधाबा तालुका पोंभुर्णा, चुनाळा तालुका राजुरा, जिबगाव तालुका सावली, मेंढकी तालुका ब्रम्हपुरी येथील मान्यवर व लाभार्थी यांचे सोबत माननीय मंत्री महोदय थेट संवाद साधणार आहे.
या संपुर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्राम पंचायतीत केले जाईल, तेव्हा लाभार्थी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आव्हान विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपुर च्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356